दररोज किती केस तुटतात; त्यावरून ओळखा हेअर फॉल आहे की नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 02:23 PM2019-01-18T14:23:46+5:302019-01-18T14:26:15+5:30
त्वचा, केस आणि वजन या तीन गोष्टींसाठी आपण अनेकदा चिंतेत असतो. कारणही तसंच असतं म्हणा, या तिनही गोष्टी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये भर पाडण्यासाठी मदत करतात.
त्वचा, केस आणि वजन या तीन गोष्टींसाठी आपण अनेकदा चिंतेत असतो. कारणही तसंच असतं म्हणा, या तिनही गोष्टी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये भर पाडण्यासाठी मदत करतात. दररोज सकाळी जेव्हा तुम्ही केस विंचरता आणि आपला हेअर ब्रश पाहता त्यावेळी त्यामध्ये अडकलेले केस पाहून अनेकदा असं जाणवत असेल की, तुमचे केस अनहेल्दी झाले आहेत. तसेच त्यांना एक्सट्रा हेअर केअरची गरज असल्याचेही तुम्हाला जाणवत असेल.
अनेकदा तुम्हीही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल की, हेयरब्रशपासून अगदी घरातील बाथरूमपर्यंत प्रत्येक ठिकाणी तुटलेले केस पडलेले दिसून येतात. त्यावेळीही तुमचे केस अनहेल्दी झाल्याचे तुमच्या लक्षात येते. पण तुम्हाला माहीत आहे का? एका ठराविक प्रमाणात केस गळत असतील तर ती सामान्य बाब असून त्यामुळे टेन्शन घेण्याची अजिबात गरज नसते. तज्ज्ञांच्या मते, दररोज 50 ते 100 केस तुटणं ही सामान्य गोष्ट आहे आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही.
नॉर्मल हेअर फॉल का होतो?
जेव्हाही आपण केस धुतो त्यावेळी ज्या केसांची मुळं कमजोर असतात, ते तुटतात. केस हेयरब्रश किंवा कंगव्याच्या सहाय्याने विंचरताना जेव्हा त्यांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करता त्यावेळी केस खेचले जातात. त्यामुळेही केस तुटतात. अशाप्रकारे केसांचं तुटणं ही सामान्य गोष्ट आहे. वेगवेगळ्या हेअरस्टाइल्स केल्यामुळेही केस तुटतात. गरोदरपणा, मासिक पाळी दरम्यानही महिलांमध्येही हेअर फॉलची समस्या वाढते. या सर्व गोष्टींमुळे दिवसभरामध्ये तुमचे 50 ते 100 केस तुटणं हे सामान्य आहे. तुमचेही एवढेच केस दररोज तुटत असतील तर टेन्शन नका घेऊ.
जास्त केसांचं तुटणं म्हणजे चिंतेची बाब
जर तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळत असतील आणि अगदी डोक्याची त्वचा दिसत असेल तर ही चिंतेची बाब आहे असं म्हणता येईल. या प्रकारच्या कारणांमागे आरोग्याशी निगडीत काहीना काही समस्या असतात आणि त्यासाठी गंभीरपणे विचार करण्याची गरज असते. जर केस गळण्याचे प्रमाण वाढले तर मात्र हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त हेअर फॉल होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. याव्यतिरिक्त मेडिकेशन, स्ट्रेस आणि मेंटल हेल्थमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. अशातच जर केस गळण्याचे प्रमाण कमी झाले नाही तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.