सोयाबीन त्वचेसाठी ठरतं फायदेशीर; जाणून घ्या कसा कराल वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 05:18 PM2018-09-30T17:18:40+5:302018-09-30T17:23:02+5:30
सोयाबीन हा आहारातील महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. अहारामध्ये सोयाबीनचा नियमीत वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो.
सोयाबीन हा आहारातील महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. अहारामध्ये सोयाबीनचा नियमीत वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. त्याचप्रमाणे सोयबीनचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठीही करण्यात येतो. जाणून घेऊयात सोयाबीनपासून फेस मास्क तयार करण्याची पद्धत.
- सर्वात आधी सोयाबीन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा.
- सकाळी उठल्यावर सोयाबीनमधील पाणी काढून टाका आणि थोडं जाडसर वाटून घ्या.
- सोयाबीनच्या या पेस्टमध्ये एक चमचा मलाई, अर्धा चमचा हळद, एक चमचा मध टाकून मिक्स करा.
- मिश्रणामध्ये पाणी टाकून चेहऱ्यावर लावण्यासाठी पेस्ट तयार करा.
तयार मास्क चेहऱ्यावर लावा
- सर्वात आधी साध्या पाण्याने चेहरा धुवून कोरडा करून घ्या.
- हाताने किंवा एखाद्या ब्रशच्या सहाय्याने तयार मास्क चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.
- 15 ते 20 मिनिटांनी चेहऱ्यावर लावलेला मास्क सुकल्यानंतर काढून टाका.
- मास्क काढून टाकण्यासाठी हाथ थोडे ओले करा आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर स्क्रब करत मास्क काढून टाका.
- त्यानंतर चेहरा स्वच्छ करा. चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो दिसून येईल.
सोयाबीन मास्क ऑयली स्कीनसाठी फायदेशीर -
आपली त्वचा तजेलदार आणि मुलायम व्हावी यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. त्यामध्ये बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांसोबतच घरगुती उपायांचाही आधार घेण्यात येतो. अनेक घरगुती पदार्थ आरोग्यासह स्कीनसाठीही फायदेशीर ठरतात. त्यातीलच एक सोयाबीन. सोयाबीन त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. या मास्कमुळे स्कीन हायड्रेट होण्यास मदत होते. त्याचबरोबर चेहऱ्यावर जमा होणारं एक्सट्रा ऑइल काढू टाकण्यासही मदत होते.
सुरकुत्या आणि वाढत्या वयाची लक्षणं कमी करतं
सोयाबीनमध्ये अॅन्टी-एजिंग तत्व असतात. याचा वापर केल्यानं चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वाढत्या वयाची लक्षणं कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे त्वचेला उजाळा देण्यासाठीही फायदेशीर ठरतं.
त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी फायदेशीर
सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-ई असतं, जे स्कीनवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतं. सोयाबीन मास्क 15 दिवस लावल्याने स्कीन उजळण्यास मदत होते.
पिंपल्स आणि ओपन पोर्सची समस्या दूर करण्यासाठी
सोयाबीन मास्क पिंपल्स आणि ओपन पोर्सची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. ओपन पोर्समध्ये जमलेली घाण स्वच्छ करण्यासही या मास्कचा उपयोग होतो. त्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते.