हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या अशी करा दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:49 AM2020-01-06T11:49:47+5:302020-01-06T11:50:13+5:30

हिवाळ्याच्या वातावरणात वेगवेगळ्या शरीराच्या समस्या उद्भवण्यास सुरूवात होते.  

how to prevent from cracked heels in winter | हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या अशी करा दूर!

हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या अशी करा दूर!

Next

हिवाळ्याच्या वातावरणात वेगवेगळ्या शरीराच्या समस्या उद्भवण्यास सुरूवात होते. थंडी सहन होत  नसल्यामुळे तुम्हाला  शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्रास व्हायला सुरूवात होते.  चेहरा तसंच हातपाय कोरडे पडणे,  हातांच्या नसा दुखणे , सांधेदूखी, आकडी येणे. यातीलच एक समस्या म्हणजे पायांच्या टाचांना भेगा पडणे. 

काहीजणांना वर्षभर ही समस्या होत असते. पण काहीजणांना हिवाळा आल्यानंतर टांचाच्या भेगांचे दुखणे हे तीव्रतेने जाणवते. तसंच जर तुम्ही कामसाठी बाहेर पडत असाल आणि चप्पल किंवा सॅण्डल घातल्यास  त्यातून जर पायांच्या भेगा दिसल्या तर ते खूपच खराब दिसतं. शिवाय तुम्हाला त्या टाचांमुळे त्रास होत असतो. तो वेगळाच.  जर तुम्हाला सुध्दा अशा समस्येचा सामना  करावा लागत असेल तर  काही घरगूती उपायांचा वापर करून तुम्ही टाचांना व्यवस्थित  करू शकता.

मीठ आणि गरम पाणी

रात्री झोपण्याच्या आधी  गरम पाण्यात मीठ घालून तुम्ही आपले पाय अर्धा तास त्यात भिजवून ठेवा. ज्यामुळे तुमच्या टाचा मऊ आणि मुलायम होतील. त्यानंतर तुम्ही टाचांना अंघोळ करण्यासाठी वापरत असलेल्या स्पजने घासा. त्यामुळे टाचांवरच्या मृतपेशी  निघून जातील. त्यानंतर बॉडीलोशन किंवा क्रिमच्या सहाय्याने मसाज करा. 

नाराळाचे तेल

तुम्ही टाचांवर क्रिमच्या ऐवजी नारळाच्या  तेलाने सुद्धा मालिश करू शकाता. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी  नारळाच्या तेलाने मसाज  करा. असे केल्यास सकाळी पाय मुलायम झालेले दिसून येतील.  जर तुम्हाला पायांना भेगा पडण्याचा त्रास जास्त होत असेल तर  तुम्ही  रोजरात्री नारळाच्या तेलाने मालिश करा. तसंच  पायांना सुती कपड्याने रात्रभर बांधून झोपा. हा प्रयोग केल्यास सकाळी पाय मऊ झालेले दिसून येतील. तर अधिक वेगाने फरक जाणवण्यासाठी  १ महिना हा प्रयोग करा. 

जर टाचांना भेगा पडल्या असतील तर नारळाचं तेल सगळ्या  केमिकल्सयुक्त औषधांपेक्षा श्रेष्ठ ठरत असतं.  नारळाच्या तेलात एंन्टीइफ्लामेंटरी गुण असतात.  ज्यामुळे त्वचेवर  मऊपणा राहण्यास मदत होते. कोरड्या त्वचेसाठी नारळाचं तेल सगळ्यात उत्तम उपाय आहे. तसंच मृतपेशींना दूर करून पायांना व्यवस्थित करण्याचं काम नारळाच्या तेलामुळे होत असतं. 

Web Title: how to prevent from cracked heels in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.