आयब्रोजचे केस गळत असतील तर 'हे' उपाय करतील मदत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 01:00 PM2018-11-06T13:00:06+5:302018-11-06T13:01:27+5:30
आयब्रोजमुळे आपल्या सौंदर्यात आणखी भर पडते. त्यामुळे अनेक महिला आयब्रोज रेखीव करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग करतात. आयब्रो रेखीव असल्यामुळे आपले हाव-भाव आणि चेहरा आणखी उठून दिसतो.
आयब्रोजमुळे आपल्या सौंदर्यात आणखी भर पडते. त्यामुळे अनेक महिला आयब्रोज रेखीव करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग करतात. आयब्रो रेखीव असल्यामुळे आपले हाव-भाव आणि चेहरा आणखी उठून दिसतो. त्यामुळे आयब्रोजची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही असं करत नसाल तर कालांतराने आयब्रोजचे केस गळतात. परिणामी आयब्रो विरळ दिसू लागतात आणि चेहऱ्य़ाचा लूक खराब होतो. तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल तर घाबरू नका काही घरगुती उपायांनी तुम्ही ही समस्या दूर करू शकता.
कॅस्टर ऑईल
कॅस्टर ऑईलचे काही थेंब घेऊन आयब्रोजला 2 ते 3 मिनिटं मसाज करा. 30 मिनिटांनी गरम पाण्याने चेहरा धुवून घ्या. हे आयब्रोजचे केस गळणं कमी करतं त्याचसोबत नवीन केस उगवण्यासाठीही मदत करतं.
कोरफड
ओवरप्लकिंग केल्यामुळे आयब्रोज फार पातळ होतात. त्यामुळे कोरफडीच्या गराने आयब्रोजला मसाज करा. त्यामुळे केसांची ग्रोथ वाढते.
खोबऱ्याचं तेल
खोबऱ्याच्या तेलामध्ये केसांशी निगडीत अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आयब्रोजचे केस गरजेपेक्षा जास्त गळत असतील तर चेहरा धुण्याआधी त्यावर खोबऱ्याच्या तेलाने मालिश करा.
प्लकिंग जास्त नका करू
ओवर प्लकिंग केल्यामुळे तुमचे केस कमी होत नाहीत तर पुन्हा येतही नाहीत. त्यामुळे प्लकिंग कमी करा.
तणाव कमी करा
अनेकदा केस गळण्याचं खरं कारण ताणही असू शकतो. त्यामुळे जास्त ताण घेऊ नका. त्याचप्रमाणे आहारावरही लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामुळे पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा.