डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 01:11 PM2019-12-24T13:11:16+5:302019-12-24T13:13:44+5:30
सुंदर, टपोरे डोळे सगळ्यांनाच हवे असतात. कारण आपल्या डोळ्यांच्या आकारामुळे आपला चेहरा सुंदर दिसत असतो.
सुंदर, टपोरे डोळे सगळ्यांनाच हवे असतात. कारण आपल्या डोळ्यांच्या आकारामुळे आपला चेहरा सुंदर दिसत असतो. तसंच डोळ्यांना सुंदर करण्यासाठी आपण वेगवेगळया प्रकारचे कॉस्मॅटिक्स वापरत असतो. कारण बदलती जीवनशैली, आणि झोपेची कमतरता यांमुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे डोळ चांगले दिसत नाहीत.
जर तुम्ही जास्त झोपलात किंवा काहीवेळा झोप कमी होते. अशा दोन्ही वेळेला डोळे सुजतात. त्यामुळे डोळे मोठे दिसायला लागतात. पण जर त्याचवेळी तुम्हाला कुठे पार्टीसाठी किंवा कामासाठी बाहेर पडायचं असेल तर असे डोळे असतील तर हवातसा पर्फेक्ट लूक तुम्हाला मिळणार नाही. काही घरगुती घटकांचा वापर करून तुम्ही डोळ्यांची समस्या सहज दूर करू शकता.
डोळ्यांसाठी जर तुम्हाला कॉफी मास्क तयार करायचा असेल तर तुम्ही कॉफी तसंच आल्याचा रस एकत्र करुन त्याची पेस्ट मेकअप रिमुव्हर म्हणून वापर करू शकता. त्यासाठी या रसात फेसवाइप्स किंवा कापूस घालून ते आपल्या डोळ्यांना लावा. काकडीचा वापर सुद्दा डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतो त्यासाठी काकडीचा रस करून तो नियमितपणे डोळ्यांना लावा. शक्य नसल्यास फक्त काकडी कापून तिचे लहान काप डोळे बंद करून डोळ्यांवर ठेवल्यास थकवा निघून जाण्यास मदत होईल. यामुळे डोळ्यांना शांतता जाणवते.
तसंच डोळ्यांच्या खालचे काळे डाग काढण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. त्यासाठी एक बटाटा घ्या. मधोमध कापून बटाटयाच्या आतला भाग डोळ्यांच्या खाली फिरवा त्यांमुळे डोळे चांगले राहतील. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे जास्त तयार झाली असल्यास नियमितपणे डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याचा रसाने हलक्या हाताने मालिश करा.
दुधात पातळ कापड अथवा कापूस बुडवून त्याच्या घडया बंद डोळयांवर ठेवल्याने डोळे लाल झाले असतील तर आराम मिळतो. त्याचप्रमाणे डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहाराचा खूप उपयोग होतो. या आहारामध्ये सर्वाधिक महत्वाचे आहे गाजर. गाजरामध्ये अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं. त्यातून डोळ्यांना पोषक घटक मिळतात.