आॅफिसचा ताण घरी कसा घालवावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2016 02:05 PM2016-09-27T14:05:47+5:302016-09-27T19:35:47+5:30

कामाचा आलेला हा तणाव कसा दूर करावा. त्याची ही खास माहिती आपल्यासाठी

How to reduce the stress of the office! | आॅफिसचा ताण घरी कसा घालवावा!

आॅफिसचा ताण घरी कसा घालवावा!

Next

/>दिवसभर आॅफिसचे काम केल्यानंतर सायंकाळी तणाव हा हमखास येतो. त्याकरिता हा तणाव घालविण्यासाठी घरी गेल्यानंतर लगचे दुसऱ्या कामाला सुरुवात करु नये. त्याअगोदर पहिल्यांदा हा तणाव कमी करणे गरजेचे आहे. कामाचा आलेला हा तणाव कसा दूर करावा. त्याची ही खास माहिती आपल्यासाठी. घरी येताच पायातील बूट किं वा चप्पल काढून अनवाणी पायाने फिरावे. यामुळे स्नायूंना एकप्रकारे चांगली शक्ती मिळते.

अशावेळेला गवत व मातीवरुन चालावे. याबरोबरच घरी आल्यानंतर कमीत कमी अर्धा तास निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जावे. याकरिता बगीच्याही महत्वाचा ठरतो. त्यामुळे दिसभरातील ताणामुळे मन हे हलके झाल्यासाखे वाटते. रिलॅक्स होऊन स्वत: विषयी पाच ते दहा मिनिटे विचार करावा. काहीजण असा तणाव घालविण्यासाठी झोप घेतात.

परंतु, ते याकरिता योग्य नसून, त्यासाठी केवळ सोफ्यावर पाय वरती घेऊन १५ मिनिटे डुलकी घ्यावी. ही डुलकी घेताना डोळे बंद ठेवून, खोलवर श्वास घ्यावा. अशा केल्याने आपल्याला आॅफिसमधील तणाव घालविता येऊ शकतो. आॅफिसचा हा तणाव घालविण्यासाठी त्याकरिता आपल्याला कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही.

Web Title: How to reduce the stress of the office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.