नाकावरच्या ब्लॅकहेट्समुळे वयस्कर दिसत असाल तर करा 'हे' घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 12:33 PM2020-02-24T12:33:22+5:302020-02-24T12:47:51+5:30
त्वचेवरच्या ब्लॅकेड्सनी हैराण असाल तर सोपे घरगुती उपाय करून तुम्ही सुटका मिळवू शकता.
प्रदुषणामुळे आणि झोप पूर्ण न झाल्यामुळे त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. सगळ्यात जास्त समस्या उद्भवते ती म्हणजे काळे डाग आणि ब्लॅकेट्सची. ब्लॅकेट्स काढण्यासाठी वेगवेगळे उपाय करून तुम्ही थकला असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही आपल्या चेहरा चांगला ठेवू शकता.पार्लरला जाऊन स्क्रब करून किंवा महागड्या ब्युटी ट्रिटमेंट करून आपण ब्लॅकहेट्सपासून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. पण घरगुती वापरातील फक्त दोन गोष्टी तुमचं काम सोपं करू शकतात.
साखर
साखरेचे अतिसेवन शरीरासाठी घातक समजलं जातं. पण तुम्ही जर त्वचेवर आणि नाकावर साखरेचा वापर केला तर फरक दिसून येईल. अर्धा चमचा साखर नाकावर चोळल्याने मृतपेशी निघून जातील आणि शरीरातील ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. त्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.
(image credit-.tiege.com)
असा करा वापर
त्वचेवरचे ब्लॅकेट्स काढून टाकण्यासाठी एक चमचा साखर घेऊन त्यात जोजोबा ऑईल मिक्स करा. त्यानंतर हे त्वचेला लावा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.
(Image credit-perfect image)
लिंबाचा रस
लिंबू हा घरगुती वापरात सहज वापरला जातो. शरीरासाठी लिंबाचा रस खूप फायदेशीर ठरत असतो. त्वचेला मऊ आणि मुलायम बनवण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरत असतं. लिंबाच्या रसात सिट्रिक एसिड असतं ते जे ब्लॅकहेट्स काढून त्वचेला सुंदर लुक देण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. (हे पण वाचा-ग्लोईंग आणि आकर्षक त्वचेसाठी हायलायटरचा 'असा' करा वापर)
(image credit- good housekeeping)
असा करा वापर
लिंबाचा वापर करून तुम्ही ब्लॅकहेट्स काढू शकता. त्यासाठी लिंबाचा रस काढून घ्या. त्यानंतर लिंबाचा रस कापसाने त्वचेला लावा. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग केल्यास त्वचा चांगली राहील. मृतपेशी निघून जाण्यास मदत होईल. ( हे पण वाचा-फाटलेले ओठ लूक बिघडवत असतील तर, हॉट आणि आकर्षक ओठांसाठी 'या' खास टिप्स)