चेहऱ्यावरील ब्राउन स्पॉट्स नाहीसे होण्यासाठी 'हे' घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 03:06 PM2018-10-11T15:06:15+5:302018-10-11T15:08:18+5:30
अनेकजणांना त्वचेवर ब्राउन स्पॉट्सची समस्या होते. कालांतराने हे स्पॉट्स चेहऱ्यावरही येतात. साधारणतः ही समस्या वाढत्या वयामुळे होते. पण काही लोकांना फार कमी वयातही या समस्येचा सामना करावा लागतो.
अनेकजणांना त्वचेवर ब्राउन स्पॉट्सची समस्या होते. कालांतराने हे स्पॉट्स चेहऱ्यावरही येतात. साधारणतः ही समस्या वाढत्या वयामुळे होते. पण काही लोकांना फार कमी वयातही या समस्येचा सामना करावा लागतो. शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता आणि सूर्याच्या घातक किरणांमुळे चेहऱ्यावर ब्राउन स्पॉट्स येतात. यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य बिघडतं. हे चेहऱ्यावरील स्पॉट्स काढून टाकण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. परंतु त्यामुळे काही खास फरक पडत नाही. त्याऐवजी घरगुती उपयांचा वापर करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊयात ब्राउन स्पॉट्स हटवण्यासाठी करण्यात येणाऱ्या घरगुती उपायांबाबत...
चंदनाचं स्क्रब
ब्राउन स्पॉटपासून सुटका करून घेण्यासाठी घरगुती स्क्रब फायदेशीर ठरतो. होममेड स्क्रब तयार करण्यासाठी 1 कप चंदनाची पावडर, अर्धा कप ओटमील, दूध आणि गुलाब पाणी एकत्र करून घ्या. आता आठवड्यातून 3 वेळा स्पॉट्स असलेल्या स्किनवर स्क्रब करा. कालांतराने हे स्पॉट्स गायब होतील.
लसूण आणि कांद्याचा रस
डार्क स्पॉट्सवर 1 चमचा बारिक केलेला लसूण आणि कांद्याचा रस मिक्स करा. त्याला 15 मिनिटांपर्यंत लावून ठेवा आणि त्यानंतर चेहरा धुवून घ्या. या मिश्रणाचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावरील ब्राउन स्पॉट्स निघून जाण्यास मदत होईल.
लिंबाचा रस
चेहऱ्यावरील डागांपासून सुटका करून घेण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. लिंबाचा रस कापसाच्या मदतीने डागांवर लावा. 15 मिनिटांनी पाण्याने चेहरा धुवून घ्या.
स्ट्रॉबेरीचा पल्प
स्ट्रॉबेरीचा पल्प व्यवस्थित स्मॅश करून दररोज ब्राउन स्पॉट्सवर लावा. 10 मिनिटांपर्यंत लावल्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
ताक
चेहऱ्यावरील स्पॉट्सपासून सुटका मिळवण्यासाठी 4 चमचे बटरमिल्कमध्ये 2 चमचे टॉमेटोचा रस मिक्स करा. याचा नियमित वापर केल्याने स्किनवरून डार्क स्पॉट्स नाहीसे होतील.