त्वचेवरील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी सुट्टीचा फायदा 'असा' करून घ्या....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 04:37 PM2020-03-22T16:37:53+5:302020-03-22T16:47:55+5:30
महिला वर्क फॉर्महोम करत असताना आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतात.
अलिकडे धकाधकीच्या आयुष्यात स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही. त्यामुळे महिलांना त्वचेच्या तसंच आरोग्याच्या अनेक समस्या सतावत असतात. सगळ्यात कॉमन समस्या म्हणजे डोळ्यांखालची काळी वर्तुळ घालवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी तसेच राहतात. सध्या कोरोनाची लागण होऊ नये सगळ्यानी सुरक्षित राहावं यासाठी सरकारने घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. या सगळया गोष्टी लक्षात घेऊन महिला वर्क फॉर्महोम करत असतानाआपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.ज्यांचा वापर करून तुम्ही आपली त्वचा चांगली ठेवू शकता.
कच्चा बटाटा
बटाटादेखील तुमचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतो. काळ्या डागांना हे काढून टाकण्यासाठी मदत करतं आणि त्याशिवाय झोपल्यानंतर डोळ्यांना येणारी सूजही कमी करतो. बटा्टयाचा रस काढून घ्या. मग तो रस पाण्यात बुडवा आणि कापसाचा बोळा डोळ्यांवर काहीवेळा साठी ठेवा. त्यानंतर डोळे धुवून टाका. सतत एक आठवडा हा प्रयोग केल्यास त्वचा चांगली दिसण्यास मदत होईल.
हळद
तुमच्या त्वचेसाठी हळद गुणकारी असते. चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे सर्वांना माहीत आहेच. पण तुमच्या डोळ्यांखालील डाग कमी करण्यासाठीही याचा उपयोग करण्यात येतो. त्यासाठी ओली हळद उगळून तिचा रस डोळ्यांच्या खालच्या भागांना लावा.
गुलाब पाणी
गुलाब पाण्याचा वापर अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. त्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करून डोळ्यांखालची काळी वर्तुळ सुंदर बनवू शकता. गुलाब पाण्यात चंदन मिक्स करून डोळ्याच्या खालच्या त्वचेला लावून तुम्ही काळपणा दूर करू शकता. ( हे पण वाचा-फक्त १० रूपयांचं वॅसलिन आणि लिंबू वापरून भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका)
एलोवेरा
एलोवेरामधील जेल काढून तुमच्या डोळयांखालील काळ्या वर्तुळांवर लावा. रात्री झोपताना हे मिश्रण लावा आणि सकाळी धुवून टाका. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा निघून जाण्यास मदत होईल. सतत एक आठवडा हा प्रयोग केल्यास त्वचा चांगली राहील. ( हे पण वाचा-महागडे स्पा नाही, तर शॅम्पू आणि साखरेने केस गळण्यापासून झटपट मिळवा सुटका)