प्रायव्हेट पार्ट्सला काळपटपणा आलाय? या उपायांनी होईल दूर ....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 11:34 AM2019-12-07T11:34:11+5:302019-12-07T11:36:04+5:30

अनेकदा स्त्रियांना तसंच पुरूषांना आपले प्रायव्हेट पार्ट्स  काळे पडत असल्याची समस्या उद्भवते.

How to remove dark skin patches by using home remedies | प्रायव्हेट पार्ट्सला काळपटपणा आलाय? या उपायांनी होईल दूर ....

प्रायव्हेट पार्ट्सला काळपटपणा आलाय? या उपायांनी होईल दूर ....

googlenewsNext

(image credit- Khubsurate.com)

अनेकदा स्त्रियांना तसंच पुरूषांना आपले प्रायव्हेट पार्ट्स  काळे पडत असल्याची समस्या उद्भवते. खास करून  काख, मांड्या,  आणि वजाईना हे शरीरातील नाजुक भाग काळे पडलेले दिसून येतात.  उष्णता, बदलते वातावतरण, सतत येणारा घाम यांमुळे त्या भागावरील त्वचा ही काळी पडत असते. काही जणांना इन्फेक्शन झाल्यामुळे सतत खाज येते. आणि त्यामुळे सुध्दा त्वचा काळी पडते. जर तुम्हाला सुध्दा या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर काही घरगुती वापरात असलेल्या वस्तूंचा वापर करुन तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. 

सर्वसाधारणपणे  काही महिलांचे प्रायव्हेट पार्ट्स हे त्वचेच्या इतर भागांपेक्षा अधिक काळे दिसायला लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी अर्धा लिंबू कापा. आणि तो लिंबू पिळून रस संपूर्ण काढून टाका. उरलेलं लिंबांच साल घेऊन मधात बुडवा. आणि हे साल काळ्या झालेल्या भागावर मसाज करा. सलग दोन आठवडे हा प्रयोग केल्यास त्वचेचा काळपटपणा दूर होईल.

चंदन पावडर हे त्वचेसाठी फायदेशीर पूर्वापार चालत आलेल्या या उपायाचा आजही तितकाच चांगला उपयोग होतो. चंदन पावडरमध्ये लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घालून ते मिश्रण काळ्या झालेल्या भागावर लावावे. १० मिनिटांसाठी लावून ठेवल्यास त्वचेचा काळेपणा निघण्यास मदत होते.

कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे विविध सौदर्यं उत्पादनात कोरफडीचा वापर केला जातो. काळपटपणा आलेल्या भागाला कोरफडीचा रस लावल्यास त्याचा त्वचा उजळण्यास नक्की फायदा होतो. 

हळद या पदार्थांचे औषधी गुणधर्म आहेत, तसेच सौंदर्य उत्पादनात हळद फायदेशीर ठरते. त्वचेच्या काळ्या झालेल्या भागांना हळद दुधात मिसळून लावल्यास फायदेशीर ठरतं. सलग २ आठवडे हा प्रयोग केल्यास फरक दिसून येतो.

Web Title: How to remove dark skin patches by using home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.