चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी पुदीन्याचे दोन खास फेस पॅक!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 11:59 AM2019-03-14T11:59:18+5:302019-03-14T12:01:59+5:30
चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात. पण केमिकल असलेल्या प्रॉडक्टने काहींना फायदा होतो तर काहींना होत नाही.
(Image Credit : Roop Mantra)
चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात. पण केमिकल असलेल्या प्रॉडक्टने काहींना फायदा होतो तर काहींना होत नाही. मात्र त्वचा चांगली ठेवण्यासाठी आयुर्वेदिक गोष्टी अधिक फायदेशीर ठरतात, असे बोलले जाते. चेहऱ्याची सर्वात सामान्य समस्या ही पिंपल्स ही असते. यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात, पण लवकर आराम मिळत नाही. आम्ही तुमच्यासाठी पुदीन्याचे दोन फेसपॅक सांगणार आहोत. हे तुमच्या चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतील.
ब्लॅकहे्डस, टॅनिंग आणि पिंपल्सपासून सुटका मिळवायची असेल तर या घरगुती उपायांचा वापर केला पाहिजे. पुदीन्यापासून तयार दोन फेसपॅक कसे तयार करायचे आणि त्यांचा कसा वापर करायचा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पुदीना आणि केळ्याचा फेस पॅक
केळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आढळतात. पुदीन्यासोबत केळी मिश्रित करून तयार केलेला फेसपॅक लावल्याने त्वचा तर चांगली होतेच सोबतच ब्लॅकहेड्स आणि रोमछिद्रे चांगल्याप्रकारे मोकळी होतात. तसेच चेहऱ्यावरील डागही दूर करण्यासाठी केळ्याचा आणि पुदीन्याचा फेसपॅक फायदेशीर ठरू शकतो. याने त्वचाही ग्लोइंग होते.
कसा कराल फेसपॅक तयार?
केळी आणि पुदीन्याची पाने चांगल्याप्रकारे एकत्र करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. हा फेस पॅक तुम्हा आठवड्यातून दोनदा वापरू शकता.
लिंबू आणि पुदीन्याचा फेसपॅक
पुदीन्याच्या पानांमध्ये सॅलिसिलिक अॅसिड आढळतं, ज्याने पिंपल्स दूर होतात. तर लिंबू चेहऱ्यावर एकप्रकारे ब्लीचिंगचं काम करतं.पिंपल्समुळे चेहऱ्यावर डाग झाले असतील तर हा लिंबू आणि पुदीन्या फेसपॅक त्या डागांना कमी करण्याचं काम करतो.
कसा कराल तयार?
लिंबू आणि पुदीन्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी १० ते १२ पुदीन्याची पाने घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस मिश्रित करा. ही पाने चांगली बारीक करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर काही वेळासाठी लावून ठेवा. पेस्ट कोरडी झाल्यावर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून २ वेळा लावू शकता.
(टिप - वरील उपाय केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. याने तुमची समस्या दूर होईलच असा दावा आम्ही करत नाही. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. काहींना याची अॅलर्जी सुद्धा असू शकते. त्यामुळे आधी तज्ज्ञांचा सल्ला द्यावा किंवा त्वचेवर टेस्ट करून बघावी. )