ओठाच्या आजूबाजूच्या मंकी पॅचेसमुळे चेहरा खराब दिसतो? घरच्याघरी 'या' उपायांनी मंकी पॅचेस होतील दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 05:00 PM2020-02-09T17:00:37+5:302020-02-09T17:03:22+5:30
ओठांभोवती अनेकांची त्वचा काळी पडत असते.
ओठांभोवती अनेकांची त्वचा काळी पडत असते. त्यामुळे संपूर्ण चेहरा आणि त्वचेचा लूक खराब होत असतो. त्वचा अशी होण्यामागे कारणं अनेक असतात. काहीजणांना त्या ठिकाणी पिंपल्स येत असतात. मग पिंपल्सचे डाग तसेच राहतात. त्यामुळे ओठांच्या आजूबाजूची संपूर्ण त्वचा खराब होत असते. या डागांना किंवा काळ्या झालेल्या त्वचेला मंकी पॅचेस असं सुद्धा म्हणतात.
कारण ओठांच्या अवतीभोवती आणि हनूवटीवर हे पिंपल्स आलेले असतात. सगळ्यांना आपले ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे सुंदर हवे हवेसे वाटतात, पण त्याच्या भोवती असलेला काळपटपणा वर लक्षच जात नाही. ओठांभोवती आलेला काळपटपणा तुमच्या गुलाबी ओठांचे सौंदर्य कमी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्वचेवरचे डाग कसे घालवायचे. मंकीपॅचेस घालवण्यासाठी तुम्हाला कोणताही जास्त खर्च करावा लागणार नाही. घरच्याघरी असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही आपली त्वचा सुंदर बनवू शकता.
लिंबाचा रस
व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यामुळे लिंबू एका नैसर्गिक ब्लिचिंग रूपात काम करतं. लिंबाचा रस प्रभावित जागेवर लावावा. १०-१५ मिनिटाने धुऊन टाकावा. हा प्रयोग केल्यास एका आठवड्यात परिणाम दिसून येईल. त्यामुळे त्वचेवरील हनुवटीवरचे डाग निघून जातील.
हळद
हळद पिग्मेंटेशन दूर करण्यात मदत करते. दह्यात हळद मिसळून चेहर्यावर लावावी. हे उपाय नियमित केल्यास तुम्हाला नक्की परिणाम मिळेल. कारण हळद त्वचेसाठी खूप लाभदायक ठरते. त्वचेचा काळपटपणा काढून टाकण्यासाठी हळदीचा फेसपॅक त्वचेच्य काळपट झालेल्या भागाला लावल्यस फायदेशीर ठरेल.
बेकिंग सोडा
जर तुम्हाला तुमच्या त्वचेरचे डाग घालवायचे असतील तर एक चमचा बेकिंग सोडा आणि तीन चमचे पाणी मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण चेहरा आणि डाग असलेल्या भागांवर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा प्रयोग एक आठवडा केल्यास फरक दिसून येईल. ( हे पण वाचा-वाढत्या वयात पांढरे आणि गळणारे केस लूक बिघडवतात? तर 'या' टिप्स वापरून केस नेहमी ठेवा चांगले)
चंदन पावडर
चंदनाचा सौदर्यप्रसाधनात वापर केला जातो. तसंच चेहऱ्यावरचे मंकिपॅचेस डाग घालवण्यासाठी चंदन पावडर फायदेशीर ठरते. त्यासाठी चंदन पावडर घेऊन त्यात दूध आणि दही घालून मिश्रण तयार करा. ते चेहऱ्याला लावा. हा पॅक सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. असे केल्यास फरक दिसून येईल. त्वचेवरचा काळपटपणा निघून जाईल. ( हे पण वाचा-गुलाबी गाल मिळवण्याची इच्छा पूर्ण करेल गाजराचा फेसपॅक, बघणारे बघतच राहतील!)