कपाळावरच्या डागांमुळे चेहरा खराब झालाय? 'या' उपायांनी डाग होतील दूर   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 10:53 AM2020-01-22T10:53:46+5:302020-01-22T11:07:21+5:30

त्वचेवर पुळकुट्या आल्यामुळे चेहरा नेहमी खराब दिसत असतो.

How to remove pimples on face or forehead by using home remedies | कपाळावरच्या डागांमुळे चेहरा खराब झालाय? 'या' उपायांनी डाग होतील दूर   

कपाळावरच्या डागांमुळे चेहरा खराब झालाय? 'या' उपायांनी डाग होतील दूर   

googlenewsNext

त्वचेवर पुळकुट्या आल्यामुळे चेहरा नेहमी खराब दिसत असतो. आपण प्रेजेंन्टेबल राहू शकत नाही. कुठेही गेल्यानंतर आपल्या चेहरऱ्याची आपल्यालाच लाज वाटत असते. साधारणपणे मासिक पाळीच्या काही दिवस आधी चेहऱ्यावर पुळ्या येत असतात. जर तुमच्या केसात सतत कोंडा होत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या कपाळावर सुद्धा होऊ शकतो. केसांमध्ये कोंडा झाल्यामुळे चेहरायावर पिंपल्स येत असतात. त्यामुळे कपाळ खराब दिसायला लागू शकतं. 

Image result for pimples

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात त्वचेची काळजी घेणं ही खूप कठिण गोष्ट आहे. ही समस्या खास करून त्या लोकांना होत असते जे लोक नेहमी  कामानिमित्ताने घराबाहेर पडत असतात. कपाळावर आलेल्या सुरकुत्या आणि डाग तुमचा लूक बिघडवू शकतात. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेचं सौदर्य कमी होत असतं. प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाऊन ट्रिटमेंट घेणं शक्य नसतं जर तुम्हाला पण याच समस्येचा सामना करावा लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही पार्लरला न जाता सुद्धा कपाळावरचे पिंपल्स दूर करू शकता.

Image result for pimples
नारळाचं तेल

Image result for coconut oil

जर तुम्हाला आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नसेल आणि तुम्ही सुरकूत्या किंवा डागांनी हैराण झाले असाल तर नारळाच्या तेलाचा वापर करून तुम्ही  कपाळावरचे पिंपल्स दूर करू शकता.  त्यासाठी नारळाच्या तेलाने कपाळावर मालिश करा. रात्रभर राहू द्या. नारळाच्या तेलात एन्टीऑक्सीडंट्स असतात.  कपाळावरचा काळपटपणा  घालवण्यासाठी नारळाचं तेल फायदेशीर ठरतं असतं. ( हे पण वाचा-केस गळती रोखण्यासाठी अनेक प्रयोग करून थकलात? तर आता मेथीच्या वापराने मिळवा नवे केस)

आळशीच्या बीया

Shutterstock

आळशीच्या बीयांमध्ये ओमेगा- ३ फॅट असतात. ते त्वचेसाठी फायदेशीर ठरतं असतात. तुम्ही तुमच्या आहारात आळशीच्या बीया किंवा आळशीच्या तेलाचा वापर करून त्वचा उजळवू शकता. आळशीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स गुणांमुळे आळशी ही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट्स गुणांनी त्वचेमध्ये कोलेजन प्रॉडक्शन आणि नव्या पेशींचं निर्माण होत असतं. यामुळे त्वचा निरोगी रहाते आणि यामुळे वाढत्या वयावरही त्याचा परिणाम होत नाही. तुम्हाला तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार हवी असेल तर तुमच्या रोजच्या आहारात किमान १ ते २ चमचे आळशीचा नक्की समावेश करून घ्या.

बेकिंग सोडा

Image result for baking soda

जर तुम्हाला तुमच्या कपाळावरचे डाग घालवायचे असतील तर एक चमचा बेकिंग सोडा आणि तीन चमचे पाणी मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण चेहरा आणि डाग असलेल्या  भागांवर लावा. त्यानंतर  कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा प्रयोग एक आठवडा केल्यास फरक दिसून येईल. ( हे पण वाचा-रेजरचा वापर त्वचेसाठी पडू शकतो महागात, अशी घ्या काळजी)

एरंडीचं तेल (Castor Oil)

Image result for caster oil

एरंडीच्या तेलात असलेले पोषक घटक  त्वचेला पोषण देण्यासाठी लाभदायक ठरत असतात. यासाठी रात्री झोपताना एरडीचं तेल  कपाळावर ज्या ठिकाणी पिंपल्स आहेत. त्याठिकाणी लावा  तेल लावत असताना जास्त लावू नका. कारण त्यामुळे चेहरा तेलकट सुद्धा होऊ शकतो. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: How to remove pimples on face or forehead by using home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.