पिंपल्सच्या काळ्या डागांनी हैराण झालात? 'या' घरगुती उपायांनी असे घालवा डाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 12:14 PM2019-12-24T12:14:41+5:302019-12-24T12:21:23+5:30
बदलत्या वातावरणात जीवनशैलीशी निगडीत आजार वाढतं चालले आहेत.
बदलत्या वातावरणात जीवनशैलीशी निगडीत आजार वाढतं चालले आहेत. वाढत जाणारे प्रदुषण, खाण्यापिण्यात असलेली अनियमितत, झोपेच्या चुकिच्या वेळा यांमुळे त्वचेची नीट काळजी घेतली जात नाही. त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येणं, पुरळ येणं तसंच त्वचा काळी पडण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. तसेच पिंपल्स आणि त्यामुळे चेहऱ्यावर येणारे डाग यांचा सामना महिलांना सर्वाधिक करावा लागतो.
दर महिन्याला जेव्हा मासिक पाळीची तारीख जसजशी जवळ येत जाते तसतसं त्वचेवर पिंपल्स यायला सुरूवात होते. आणि हे दर महीन्याला रिपीट होत असतं. मासिक पाळी येऊन गेल्यानंतर पिंपल्स कमी होतात .पण चेहऱ्यावर त्या पिंपल्समुळे आलेले डाग तसेच राहतात. काही केल्या डाग कमी होत नाहीत. मग चेहरा खराब दिसू लागतो. तसंच सतत महागड्या क्रीम लावून डाग घालवण्यासाठी २-३ आठवडे वाट पहायाला लागते. जर तुम्ही सुद्दा पिंपल्सना कंटाळले असाल तर काही घरगुती वापरात असलेल्या गोष्टींचा वापर करून तुम्ही त्वचा सुंदर ठेवू शकता.
बेकिंग सोडा
पिंपल्समुळे आलेल्या डागांपासून सुटका मिळविण्याचा सोपा आणि घरगुती उपाय बेकिंग सोडा आहे, कारण यामुळे चेहऱ्याचे तेल कमी होते आणि चेहऱ्यावर लागलेली धूळ कमी होते. आणि हा डेड स्किन सेल्स ला सुद्धा मारून टाकतो. चमचा बेकिंग सोडयामध्ये थोडे पाणी आणि लिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. लावण्याआधी आपल्या चेहऱ्याला धुवून घ्या. आता घट्ट पेस्ट डागांवर लावा आणि लावल्यानंतर याला पूर्ण सुकू द्या. कधीही बेकिंग सोड्याला चेहऱ्यावर जास्त वेळेपर्यंत लावून ठेवू नका. कारण यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. यानंतर आपल्या चेहऱ्याला हलक्या गरम पाण्याने धुवून घ्या.
पपई
पपई मध्ये काळे डाग दूर करणारे खूप पोषक तत्व आहेत. त्याचबरोबर हे एंटीओक्सिडेंट, विटामिन A आणि एंजाइमचा सुद्धा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे आपल्या चेहऱ्याची पिंपल्सची समस्या दूर होते. चेहरा मुलायम आणि कोमल राहतो. पपईला तुकड्यामध्ये कापून किसा आणि त्याला डाग असलेल्या जागेवर लावावे. लावल्यानंतर १० ते १५ मिनिटापर्यंत राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवून घ्या.
चंदन पावडर
चंदनाचा सौदर्यप्रसाधनात वापर केला जातो. तसंच चेहऱ्यावर पडलेले काळे डाग घालवण्यासाठी चंदन पावडर फायदेशीर ठरते. त्यासाठी चंदन पावडर घेऊन त्यात दूध आणि दही घालून मिश्रण तयार करा. आणि ते चेहऱ्याला लावा. हा पॅक सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. असे केल्यास फरक दिसून येईल.
लिंबाचा रस
डागांपासून मुक्तता मिळविण्यासाठी एक आणखी सोपा उपाय लिंबाच्या रसाचा उपयोग करू शकता, ज्यामध्ये विटामिन सी भरपूर असते. लिंबाचा रस कमीत कमी वेळामध्ये डाग घालवतो. चेहऱ्यावर नेहमी ताज्या लिंबाच्या रसाचाच उपयोग करा. यासाठी लिंबाचा रस कापासामध्ये भिजवा आणि झोपायाच्या आधी डागांवर लावा.