नखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 05:21 PM2020-01-19T17:21:54+5:302020-01-19T17:32:33+5:30

आपण नेहमी नोटीस करत असतो की हातांच्या नखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत  जाते.

How to remove tanning of skin around the nails | नखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा

नखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा

Next

(image credit-vyuty)

आपण नेहमी नोटीस  करत असतो की हातांच्या नखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत  जाते  आणि गडद दिसायला सुरूवात होते. नखांच्या भागात काळी वर्तुळ आलेली असतात.  तेव्हा  हात खराब दिसायला लागतो.  आपण घरात असो किंवा बाहेर कोणतंही काम करत असताना हात दिसून येत असतो. अशाच जर हात काळा पडलेला दिसत असेल  तर ते आपल्याला थोडं विचित्र वाटतं असतं.  असं तुमच्या हातांना सुद्धा होत असेल तर टेंन्शन घ्यायचं  काही कारण नाही.  घरगुती  उपायांचा वापर करून तुम्ही आपल्या नखांच्या आजूबाजूच्या त्वचेला सुंदर बनवू शकता.

Image result for nails tan skin

मुली आपली नखं वाढवण्याकरिता खूप प्रयत्न करत असतात.  पण त्याचसोबत नखांच्या आजूबाजूच्या त्वचेची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं असतं. काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही मेन्यिक्यूअर केल्यासारखी उजळदार त्वचा मिळवू शकता.

Image result for nails tan skin
 टॉंमॅटो 

Image result for tomato

टॉमॅटोमध्ये व्हिटामीन सी आणि व्हिाटामीन ई असतं त्यामुळे त्वचा उजळवण्यासाठी ते खूप फायदेशीर ठरतं असतं.   त्वचेवर आलेला काळपटपणा दूर करण्यासाठी  फायदेशीर ठरतं असतं. टॉमॅटोमध्ये  विटामीन सी असल्यामुळे ते टॅनिंग घालवण्याठी लाभदायक ठरतं असतं. यासाठी  तुम्ही टॉमॅटो दोन भागात कापून घ्या त्यांतर हातांना चोळा त्यानंतर अर्ध्या तासानी हात धूवून टाका. जास्त चांगाला रिजल्ट हवा असल्यास रात्रीच्यावेळी हा प्रयोग करा. 


एलोवेरा जेल

Image result for aloe vera
नखांच्या जवळ जर जास्त काळपटपणा आला असेल तर एलोवेरा जेलचा वापर करा. त्वचेला पोषण देत असलेले गुण एलोवेरात असतात. जस चेहरा आणि  त्वचेच्य इतर भागांवर त्वचेचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे हातांवर सुद्धा अलोवेरा जेलचा वापर केल्यास फरक दिसून येईल. 

हळदीची पावडर 

Image result for turmeric

चमकदार आणि ग्लोईंग त्वचेसाठी हळदीचा वापर केला जातो.  नखांच्या आजूबाजूची त्वचा सुंदर बनवण्यासाठी  हळदीमध्ये लिंबू आणि पाणी घालून पेस्ट तयार  करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट हातांना लावून  मसाज करा. असे केल्यास  नखांसोबतच नखांची त्वचा  चमकदार होईल. शिवाय  हळदीतील  एन्टीऑक्सीडन्टस गुण त्वचेसाठी लाभदायक ठरतात.( हे पण वाचा-तुमच्या 'या' चुकांमुळे शेविंग केल्यांवर होते जळजळ आणि स्कीन डॅमेज)

दही

Image result for dahi

त्वचेवर पोषण देण्यासाठी  किंवा त्वचेचा काळपटपणा दूर  करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं असतं. दही हाताला लावून तुम्ही तुमच्या नखांच्या आ़जुबाजूची त्वचा उजळून काढू शकता. दह्यामध्ये असणारं लॅक्टिक एसिड त्वचेवरील डेड सेल काढून टाकण्यासाठी उपयोगी ठरतं. त्यामुळे तुम्ही 'फेस पॅक' म्हणून दह्याचा वापर चेेहरा आणि शरीराच्या विविध भागांवर सुद्धा करू शकता. ( हे पण वाचा-घरच्या घरी केस स्ट्रेट करण्याच्या सोप्या टिप्स, पार्लरला जाण्याची पडणार नाही गरज! )

Web Title: How to remove tanning of skin around the nails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.