पार्लरच्या खर्चाशिवाय सोपे उपाय वापरून नको असलेले केस घरच्याघरीच काढा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 06:26 PM2020-04-02T18:26:23+5:302020-04-02T18:35:03+5:30
लॉकडाऊनमुळे तुम्हाला पार्लरला जाता येत नसेल तर टेंशन घेण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही घरच्याघरी सुद्धा शरीरावरचे नको असलेले केस काढून टाकू शकता.
सध्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. जास्तीत जास्त लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून वाचवता यावं. यासाठी घरी थांबण्याचं आवाहन केलं आहे. पण अनेक महिलांना आठवड्यातून एकदा तसंच काहींना पंधरा दिवसातून एकदा आपल्या त्वचेवर ग्लोईंग लूक मिळवण्यासाठी पार्लरला जायची सवय असते. लॉकडाऊनमुळे तुम्हाला पार्लरला जाता येत नसेल तर टेंशन घेण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही घरच्याघरी सुद्धा शरीरावरचे नको असलेले केस काढून टाकू शकता.
तुरटी आणि गुलाबपाणी
एका वाटीत दोन मोठे चमचे गुलाबपाणी घ्या, आता यामध्ये अर्धा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करा. चमच्यामध्ये सॉल्युशन घेऊन बघा आणि खात्री करून घ्या की, तुरटी व्यवस्थित मिसळली आहे की नाही, कापसाच्या मदतीने हे त्वचेवर लावा त्यानंतर २० मिनिट ठेवा आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुवा .
बेसन आणि हळद
हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहऱ्यावरील नको असलेले केस तर निघून जातीलच पण तुमच्या चेहऱ्यावर चमकदेखील येईल. एका वाटीत अर्ध कप बेसन घ्या, यामध्ये अर्धा कप थंड दूध मिसळा, एक चमचा ताजं क्रिम आणि हळददेखील मिसळा ,आता हे मिश्रण चेहऱ्यावर लाऊन २० मिनिटं ठेवा. हे मिश्रण सुकल्यावर हाताने काढा अथवा पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करा आणि नको असलेले त्वचेवरील केस हटवा.
अंड आणि पांढरा भाग
अंड तोडून त्याचा सफेद भाग एका वाटीमध्ये घ्या. यामध्ये एक चमचा साखर आणि अर्थ चमचा मक्याचं पीठ मिसळा. हे मिश्रण ब्रशच्या सहाय्याने चेहऱ्यावर केस असतील त्या ठिकाणी लावा. १०ते २० मिनिटं हे चेहऱ्यावर सुकू द्यावं. नतंर कोणत्याही सुक्या अथवा रफ कपड्याने तुमचा चेहरा साफ करा आणि मग थंड पाण्याने धुवा.
हेअर रिमुव्हर क्रिम
ज्या भागामधील केस काढायचे असतात त्या भागावर या क्रीमचा पातळ थर लावावा ओल्या कापडाने खालून वरच्या दिशेने ते क्रीम पुसून काढावे. त्यानंतर त्वचा धुवून कोरडी करावी. हेअर रिमुव्हल क्रीम शरीरावर कोणत्याही भागावर लावता येते.