अपर लिप्स हेयर्सना कंटाळला आहात?; हे घरगुती उपाय करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 07:21 PM2019-04-03T19:21:29+5:302019-04-03T19:22:39+5:30

फेशिअल हेयर मुलींसाठी एक मोठी समस्या असतात. या केसांपासून सुटका करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात येतात. पण काही केल्याने यापासून सुटका होत नाही.

How to remove upper lips hair naturally | अपर लिप्स हेयर्सना कंटाळला आहात?; हे घरगुती उपाय करतील मदत

अपर लिप्स हेयर्सना कंटाळला आहात?; हे घरगुती उपाय करतील मदत

googlenewsNext

फेशिअल हेयर मुलींसाठी एक मोठी समस्या असतात. या केसांपासून सुटका करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात येतात. पण काही केल्याने यापासून सुटका होत नाही. फेस हेयरफ्री करण्यासाठी त्या थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगचा आधार घेतात. ज्यामध्ये त्यांना वेदना तर होतातच पण तेवढेच पैसेही खर्च करावे लागतात. फेशिअल हेयरबाबत सर्वात मोठी समस्या म्हणजे, यांची ग्रोथ फार लवकर होते. त्यामुळे यापासून सुटका करण्यासाठी सतत पार्लरमध्ये जावं लागतं. 

जर तुम्हालाही या समस्यांपासून सुटका करून घ्यायची असेल तर काही घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यांची ग्रोथ कमी करण्यासोबतच ते दूर करण्यासाठीही मदत करतात. 

हळद आणि दूध

एक टेबलस्पून दूधासोबत एक टेबलस्पून हळद एकत्र करा. हे अप्पर लिप्सवर लावा. 20 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित सुकल्यानंतर रब करून थंड पाण्याच्या मदतीने हे काढून टाका. लक्षात ठेवा की, रबिंग करताना केसांची ग्रोथ होत असलेल्या विरूद्ध दिशेन करा. 

एग वाइट 

एका बाउलमध्ये एका अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यामध्ये मक्याचं पीठ आणि एक टेबलस्पून साखर एकत्र करा. तुम्ही पीठीसाखरेचाही वापर करू शकता. तीनही गोष्टी व्यवस्थित एकत्र केल्यानंतर लिप्सवर लावा. सुकल्यानंतर हे हेयर ग्रोथ होत असलेल्या विरूद्ध दिशेने खेचून काढून टाका. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. 

जिलेटिन 

एका बाउलमध्ये एक टेबलस्पून जिलेटीनसोबत दोन चमचे दूध आणि तीन थेंड लेव्हेंडर ऑइल एकत्र करा. हे मायक्रोवेव्हमध्ये 12 सेकंदांसाठी ठेवा. गरम झाल्यानंतर एक पेस्ट तयार होइल. ही पेस्ट अप्पर लिप्सवर लावा. सुकल्यानंतर काढून टाका आणि चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.

पुदिन्याचा चहा 

एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, पुदिन्याचा चहा चेहऱ्यावरील केसांची ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी मदत होते. हे तम्हीही ट्राय करू शकता.  

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: How to remove upper lips hair naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.