गुलाबी थंडीत टवटवीत आणि गुलाबी त्वचा मिळवण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:51 AM2019-11-21T11:51:23+5:302019-11-21T11:51:34+5:30
हिवाळ्यात त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना सर्वांनाच करावा लागतो. खरंतर या दिवसात त्वचेची काळजी घेणं एक आव्हानच असतं.
हिवाळ्यात त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना सर्वांनाच करावा लागतो. खरंतर या दिवसात त्वचेची काळजी घेणं एक आव्हानच असतं. कारण अनेक उपाय करूनही अनेकांना त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतातच. अशात हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास उपाय करावे लागतात. यासाठी महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स नाही तर काही घरगुती उपाय कामी येतात.
तांदूळ आणि तिळाचं स्क्रब
तांदूळ आणि तीळ मिश्रित करून घरीच स्क्रब तयार करा. हे स्क्रब तयार करण्यासाठी समान प्रमाणात तांदूळ आणि तीळ घ्या. रात्रभर हे भिजवून ठेवा. सकाळी तांदूळ आणि तीळ बारीक करा आणि आंघोळीआधी ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हवं तर तुम्ही शरीरावरही लावू शकता. २ ते ३ मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
दुधाने त्वचेची काळजी
पूर्वीपासूनच चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. तुम्हीही दुधाचा वापर करून त्वचेवर ग्लो आणू शकता. यासाठी रात्री चेहऱ्यावर रूईच्या मदतीने दूध लावा आणि नंतर झोपा. सकाळी उठल्यावर चेहरा धुवावा.
मुलतानी मातीचा वापर
(Image Credit : indiatvnews.com)
मुलतानी माती त्वचेसाठी किती फायदेशीर असते हे तुम्हाला माहीत असेलच. मुलतानी मातीमध्ये मध मिश्रित करून फेसपॅक तयार करा. काही वेळाने चेहरा धुवावा. पण ज्यांची त्वचा कोरडी असेल त्यांनी हिवाळ्यात मुलतानी मातीचा वापर करू नये.
टोमॅटो फेसपॅक
(Image Credit : india.com)
टोमॅटो सुद्धा त्वचेची काळजी घेण्यासाठी फायदेशीर ठरतं. यासाठी १ चमचा टोमॅटोचा रस घ्या आणि त्यात एक चमचा मध मिश्रित करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने चेहरा पाण्याने धुवावा.