उन्हाळ्यात केवळ गोऱ्यांनाच नाही तर सर्वांना घ्यावी लागते त्वचेची काळजी, जाणून घ्या ७ टिप्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 12:20 PM2019-04-09T12:20:14+5:302019-04-09T12:25:00+5:30

उन्हाळा आला की सामान्यपणे ज्यांची त्वचा उजळ किंवा गोरी आहे अशांनीच काळजी घ्यायला हवी असा एक गैरसमज आढळतो.

How to take care of all type of skin in summer | उन्हाळ्यात केवळ गोऱ्यांनाच नाही तर सर्वांना घ्यावी लागते त्वचेची काळजी, जाणून घ्या ७ टिप्स 

उन्हाळ्यात केवळ गोऱ्यांनाच नाही तर सर्वांना घ्यावी लागते त्वचेची काळजी, जाणून घ्या ७ टिप्स 

googlenewsNext

(Image Credit : www.findingbeautyme.com)

उन्हाळा आला की सामान्यपणे ज्यांची त्वचा उजळ किंवा गोरी आहे अशांनीच काळजी घ्यायला हवी असा एक गैरसमज आढळतो. उन्हाच्या तीव्र झळांमुळे केवळ रंगच नव्हे तर त्वचेचा पोत खराब होणे, सावळी त्वचा रापणे, घाम-अस्वच्छतेमुळे त्वचेच्या रंध्रांमध्ये इन्फेक्शन होणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर अकालीच सुरकुत्या पडणे या समस्याही सर्वांना होऊ शकतात. त्वचेची काळजी हा स्त्री-पुरुषांसाठी समान असल्याने सर्वांनीच त्वचेची काळजी विशेषत: उन्हाळ्यात घ्यायला हवी. समवयस्कांमध्ये आपण तरुण, फ्रेश दिसायला हवंच असं तुम्हाला वाटत असेल तर काळजी नक्की घ्या. त्यासाठी अजुन काही टिप्स….

१) आपली त्वचेत अनेक सुक्ष्म रोमछिद्रे असतात. तुमची त्वचा जितकी स्वच्छ, मोकळी असेल तेवढे त्वचेचे आरोग्य उत्तम राहील. स्त्रियांनी उन्हाळ्यात शक्यतो गडद मेक-अप करणे टाळावे. मेक-अपमुळे त्वचेची रोमछिद्रे बंद होत असल्याने त्वचेला एक वेगळाच कोरडेपणा येतो. दिर्घकाळ रोमछिद्रे बंद राहिली तर, एखाद्या बंदिस्त खोलीप्रमाणे त्वचेचीही घुसमट होते, व पोत बिघडायला सुरुवात होते. 

२) दिवसातुन किमान चार वेळा थंड पाण्याने अलगदपणे चेहरा-मानेच्या त्वचेवर पाणी लावल्याने मारल्याने त्वचा टवटवीत होते. त्यानंतर मऊ कापडाने किंवा टॉवेलने ती हलकेच टिपुन घ्यावी, खसाखसा चोळू नये.

(Image Credit : University Dermatology)

३) आठवड्यातुन एकदा तासभर वेळ काढुन चंदन पावडर २ चमचे, गुलाबपाणी ३ चमचे आणि चमचाभर मुलतानी मिट्टी यांचे एकत्र मिश्रण करुन त्याने फेशिअल घरच्या घरी केलंत तरी त्वचेचा पोत सुधारुन चेहरा फ्रेश होतो. पंधरा दिवसांतून एकदा तरी उत्तम मसाज क्रिम आणून त्वचेला घरच्या घरी व्यवस्थितपणे मसाज करणे खुपच चांगले. मसाजमुळे त्वचेखालचे रक्तसंचालन उत्तम रहाते. मसाज हलक्या हाताने गोलाकार (circular clockwise) करावा.

४) कडक उन्हाचे त्वचेवरील दुष्परिणाम टाळण्यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे फक्त पिकलेल्या टोमॅटोचा गर काढुन त्याने संपुर्ण चेहरा, मान, हात यावर एक हलकासा थर देऊन पंधरा मिनिटांनी तो स्वच्छ धुवून टाकला तरी त्वचेचे टॅनिंग कमी होते.

(Image Credit : Essays Of Afric)

५) उन्हाळ्यात जंकफुड, मसालेदार पदार्थ, मद्यपान टाळणे. मांसाहार करत असाल तर तो अगदी माफक प्रमाणात करणे, आहारात अधिकाधिक द्रवपदार्थांचा समावेश केल्यानेही खुप फरक पडतो. उन्हाळ्यात दुधी, पालक, कोबी, टोमॅटो यांचे सेवन चांगलं ठरेल. द्रवपदार्थांत ताक, लिंबुपाणी, पन्हे, कोकम सरबत, आवळा सरबत अशा द्रव्यांचे सेवन हे त्वचेबरोबर आरोग्यासही अत्यंत लाभदायक आहे.

६) सध्या सनस्क्रिन किंवा सनब्लोक क्रिम चांगली उपलब्ध आहेत त्यातील ज्यांचा SPF (Sun protection factor) किमान १५ आहे अशी क्रिम्स वापरणे केव्हाही उत्तम.

(Image Credit : neutrogena-me.com)

७) निसर्गाने प्रत्येकाला एक छान त्वचा दिलेली आहे. तिची काळजी घेणे. ऋतुंनुसार तिच्या आरोग्यास जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, तरच तुम्ही दीर्घकाळपर्यंत तरुण दिसु शकता. उत्तम त्वचेच्या व्याखेत रंग हा मुद्दा सर्वस्वी नसुन त्वचेचा दर्जा, चकचकीतपणा, स्वच्छता, पोत हे घटकही अंतर्भुत आहेत, त्यांची जपणुक प्रत्येकाने मनापासुन करावी.

Web Title: How to take care of all type of skin in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.