बिअर्ड लूक ठेवताना करू नका 'या' चुका, मग म्हणाल सांगितलं नाही.....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 02:35 PM2019-12-06T14:35:44+5:302019-12-06T15:47:15+5:30
सध्याच्या काळात दाढी वाढवायचा क्रेज हा सगळ्या क्षेत्रातील व्यक्तींमध्ये दिसून येतो.
सध्याच्या काळात दाढी वाढवायचा क्रेज हा सगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींमध्ये दिसून येतो. मुलांना आपली पर्सनॅलिटी चांगली दिसण्यासाठी बिअर्ड हवीहवीशी वाटतं असते. चांगली दाढी आणि मिशा ठेवणं मुलांची फॅशन आहे. जर तुम्ही दाढी वाढवायचा विचार करत असाल तर दाढीच्या केसांच्या वाढीविषयी अनेक गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
काही लोकं दाढी वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. पण ती उत्पादनं त्वचेसाठी अनुकूल असतीलच असे नाही. अनेकदा चुकीच्या पध्दतीने क्रिम्स् चा वापर केल्यामुळे त्वचा खराब होते. क्लीन शेव असल्यापासून हॅडसम लुक येईपर्यत जर तुम्ही अश्या प्रकारच्या चुका केल्या तर बिअर्ड यायला वेळ लागू शकतो.
(Image credit-hellowdox)
चांगली दाढी येण्यासाठी तुमच्या आहारामध्ये मिनरल्स आणि व्हिटामिन्स असणे गरजेचे आहे. ताण असल्यास दाढीची वाढ लवकर होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ‘रिलॅक्स’ राहण्याचा प्रयत्न करा. ताण-तणावात राहणे टाळा. चांगल्या मॉश्चरायझरने नियमित चेहऱ्यावर मसाज करा. दररोज चेहरा व्यवस्थीत धुवा.
दाढीचे पांढरे केस तोडू नका. कारण केस तोडल्यास मुळांना समस्या उद्भवण्याची शक्यता असते. दाढीचे केस कंगव्याने नियमीतपणे विंचरा. त्यामुळे रक्ताभिसरण होऊन केसांची वाढ होण्यास मदत होईल. नेकलाइनला शक्यतो रेजर वापरू नका. कारण नेकलाईनला रेजर वापरल्यास दाढी दोन भागात विभागण्याची शक्यता असते. त्यामुळे दाढीची वाढ चांगल्याप्रकारे होत नाही. तसेज दाढी करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या रेजरचा वापर करा. कारण निकृष्ट दर्जाचे रेजर वापरल्यास त्वचा काळी पडण्याची शक्यता असते.