उन्हाळ्यात त्वचा काळवंडली का? मग हे उपाय करा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 05:26 PM2018-04-19T17:26:08+5:302018-04-19T17:26:08+5:30
उन्हाळ्यात त्वचा काळवंडते. तसेच त्वचेची चमक कमी होऊन ती निस्तेज होऊ शकते. अशात असे होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
(Image Credit : Weddingplz)
उन्हाळा आला की, वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खासकरुन त्वचेसंबंधी अनेक समस्यांचा सामना अनेकांना करावा लागतो. कडक उन्हाचा चेह-यावर मोठा परिणाम होतो. उन्हाळ्यात त्वचा काळवंडते. तसेच त्वचेची चमक कमी होऊन ती निस्तेज होऊ शकते. अशात असे होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात घ्यावी ही काळजी
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता असते.
भरपूर पाणी असणारी फळे सेवन करण्याची आवश्यकता असते. टरबूज, खरबूज, लिची यासारखे फळं उन्हाळ्यात खाता येतात.
कडक उन्हात बाहेर जाण्याच्या 15 मिनिटे अगोदर त्वचेवर सन्सक्रीम लावणे गरजेचे असते.
शुष्क त्वचेसाठी चांगल्या स्क्रब क्रीमने मसाज करावे. तसेच दिवसातून 3 ते 4 वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.
आठवड्यातून एकदा प्राकृतिक फेसपॅक जसे की हळदी फेसपॅक, चंदन फेसपॅक, एलोवेरा फेसपॅक बनवून चेहर्याची चमक कायम ठेवता येते.
टोमॅटो, काकडी, संत्री, मोसंबीचे फ्रिजरमध्ये आईसक्युब तयार करून त्यानेही चेहर्याचा मसाज केल्याने त्वचा उजळते.
उन्हाळ्यात चेहर्यावर ब्लिचिंग करू नये, त्यामुळे त्वचा काळी पडण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यात जास्तीत जास्त सुती कपडे वापरण्यावर भर द्यावा.
महिला आणि युवती उन्हापासून बचाव करण्यासाठी सनकोट सुती स्टोल वापरू शकतात.
साबण, हार्ड ब्युटी प्रॉडक्ट, अति गरम पाणी यापासून त्वचेचे संरक्षण करावे.