उन्हाळ्यात पायांना होतं लगेच पसरतं इन्फेक्शन; अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 01:48 PM2019-04-16T13:48:26+5:302019-04-16T13:48:39+5:30

वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या चेहऱ्यासोबतच आपल्या पायांवरही होत असतो. पायांचं सौंदर्य वाढविणयासाठी त्यांची खास काळजी घेणं गरजेचं असतं.

How to take care of your feet and avoid feet infection | उन्हाळ्यात पायांना होतं लगेच पसरतं इन्फेक्शन; अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात पायांना होतं लगेच पसरतं इन्फेक्शन; अशी घ्या काळजी

Next

वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या चेहऱ्यासोबतच आपल्या पायांवरही होत असतो. पायांचं सौंदर्य वाढविणयासाठी त्यांची खास काळजी घेणं गरजेचं असतं. वातावरण बदलल्याने नेहमी पायांवर संक्रमण होतं. त्यामुळे पायांची योग्य काळजी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. 

3 प्रकारचं असतं पायांना होणारं संक्रमणं :

रिंगवर्म 

रिगवर्म पायांना होणाऱ्या अल्सरचाच एक प्रकार आहे. यामध्ये पायांची त्वचा लाल आणि कठिण होते. ही समस्या फंगल इन्फेक्शमुळे पायांना होते. 

नखांना होणारं इन्फेक्शन 

साधारणतः नखांना होणारं इन्फेक्शन पाण्यामध्ये सतत राहिल्याने होतं. अशातच नखांचं लाल होणं आणि नखांवर सूज येण्यासोबतच खाजही येते. 

एक्जिमा

एक्जिमामध्ये पायांची त्वचा निघू लागते. ही समस्या बॅक्टेरियामुळे होते. एक्जिमा झाल्यास दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. त्यामुळे लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 
पायांना होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी या गोष्टी लक्षात घ्या :

अनवाणी पायांनी फिरू नका

काही लोकांना ऑफिस किंवा घरामध्ये अनवाणी पायांनी फिरण्याची सवय असते. असं  केल्याने पायांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे गरजेच आहे की, घरी आल्यानंतर पय धुतल्यानंतर अनवाणी पायांनी फिरण्याऐवजी स्लीपरचा वापर करा. 

शूजसोबत सॉक्स वेअर करा

शूजसोबत सॉक्स वेअर केल्याने पायांना इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो. जेवढं पायांमध्ये शूज वेअर करणं गरजेचं असतं. तेवढचं त्यासोबत सॉक्स वेअर करणंदेखील गरजेचं असतं. 

पाय स्वच्छ करण्यासाठी 

धावपळीच्या दैनंदीन जीवनामध्ये पायांची स्वच्छता करण्यासाठी वेळ काढा. घरातून बाहेर पाय धूळ आणि मातीच्या संपर्कात येतात. यामुळे पायांना इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. यापासून बचाव करण्यासाठी संध्याकाळी घरी परतल्यानंतर पाय साबणाने स्वच्छ करावे. पाय स्वच्छ करताना पायाच्या बोटांमधील भागही स्वच्छ करावा. 

टिप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: How to take care of your feet and avoid feet infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.