अरबी महिला चेहऱ्यावर काय लावतात, जी इतकी ग्लो करते त्यांची त्वचा; डॉक्टरने सांगितला फंडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 02:34 PM2024-11-11T14:34:17+5:302024-11-11T14:35:35+5:30
Skin Glow Tips : डॉक्टर फातिमा यांनी एक नॅचरल उपाय सांगितलाय. ज्यामुळे अरबी महिलांची त्वचा गुलाबी, मुलायम आणि चमकदार दिसते.
Skin Glow Tips : भारतीय महिलांच्या नॅचरल सौंदर्याचं जगभरात कौतुक केलं जातं. मात्र, इतरही देशांमधील महिलांचं सौंदर्य देखील मोहिनी घालणारं असतं. खासकरून अरबी महिलांबाबत सांगायचं तर त्यांच्या असा गुलाबी ग्लो दिसतो, जो सगळ्याच तरूणींना हवा असतो. अशात याच अरबी महिलांच्या गुलाबी ग्लोचं रहस्य पाकिस्तानी डॉक्टर शिरीन फातिमा यांनी सांगितलं.
अनेकदा महिला किंवा तरूणींना हा प्रश्न पडत असतो की, अरबी महिला चेहऱ्यावर असं काय लावतात की, त्यांचं त्वचा इतकी ग्लो करते? तर यावर डॉक्टर फातिमा यांनी एक नॅचरल उपाय सांगितलाय. ज्यामुळे अरबी महिलांची त्वचा गुलाबी, मुलायम आणि चमकदार दिसते.
सामान्यपणे तरूणी आणि महिला चमकदार व मुलायम त्वचा मिळवण्यासाठी वेगवेगळे मेकअप करतात. वेगवेगळ्या क्रीम्सचा वापर ककतात. मात्र, या सगळ्या गोष्टींचा वापर करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. कारण एका उपायाने तुमची त्वचा नॅचरली ग्लो करू लागेल.
अरबी उपाय
जास्वंदाची ५ ते ६ फुलं
१ ग्लास पाणी
तांदळाचं पीठ एक चमचा
कॉर्न फ्लोर 1 चमचा
मिल्क पावडर 1 चमचा
बिटरूट पावडर एक चमचा
कसं कराल तयार?
सगळ्यात आधी जास्वंदाची फुलं १ ते २ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर तुमच्या आवडीचं एक साबण घ्या आणि ग्राइंड म्हणजे बारीक करा. यानंतर एक बाउल घ्या आणि त्यात तांदळाचं पीठ, कॉर्न फ्लोर, मिल्क पावडर आणि बिटरूट पावडर टाका. शेवटी बाउलमध्ये जास्वंदाच्या फुलांचं पाणी टाकून चांगलं मिक्स करा. आता ही पेस्ट आइस क्यूब प्लेटमध्ये टाकून २ आठवडे फ्रीजमध्ये ठेवा. २ आठवड्यांनी तयार झालेली आइस क्यूब रोज चेहऱ्यावर फिरवा आणि याने तुमच्या त्वचेवर नॅचरल पिंक ग्लो दिसू लागेल.
जास्वंदाच्या फुलाचे फायदे
जास्वंदाच्या फुलाचे आरोग्यासोबतच त्वचेलाही फायदे मिळतात. यात एक्सफोलिएटिंग, अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. या फुलाने मृत त्वचा दूर करण्यास आणि त्वचा साफ करणे व नॅचरल दिसण्यास मदत मिळते.