शरीराच्या दुर्गंधीमुळे लोक दूर पळतात? तुरटीचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 01:47 PM2024-09-26T13:47:51+5:302024-09-26T13:48:46+5:30
Alum for Body Odor : तुम्ही शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी तुरटीचा वापर करू शकता. चला जाणून घेऊ तुरटीचा वापर कसा करावा.
Alum for Body Odor : हिवाळा असो वा उन्हाळा शरीरातून येणारी दुर्गंधी अनेकांसाठी एक मोठी समस्या असते. जास्त घाम किंवा बॅक्टेरिया यामुळे ही समस्या होते. ही समस्या दूर करण्यासाठी जास्तीत जास्त लोक परफ्यूम किंवा डिओड्रंटचा वापर करतात. पण यातील केमिकल्समुळे त्वचेला अनेक समस्या होतात. अशात तुम्ही शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी तुरटीचा वापर करू शकता. चला जाणून घेऊ तुरटीचा वापर कसा करावा.
शरीराची दुर्गंधी दूर करते तुरटी
घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. हा एक स्वस्त आणि सोपा उपाय आहे. तुरटी एक नॅचरल गोष्ट आहे. ज्याचा वापर फार पूर्वीपासून त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. यात अॅंटी-स्पेटिक गुण असतात जे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. यामुळे शरीराची दुर्गंधी दूर होते.
कसा कराल तुरटीचा वापर?
एका वाटीमध्ये थोडं पाणी घ्या. त्यात तुरटीचा एक छोटा तुकडा टाका. हा तुकडा पूर्ण विरघळू द्या. जेव्हा तुरटी पूर्णपणे विरघळेल तेव्हा हे पाणी रूईच्या मदतीने शरीराच्या अशा अवयवांवर लावा जिथे दुर्गंधी येते. काही वेळ हे मिश्रण तसंच कोरडं होऊ द्या. नंतर थंड पाण्याने त्वचा धुवून घ्या.
तुरटी लावा
दुसरा उपाय म्हणजे तुरटीचा एक तुकडा पाण्यात भिजवा आणि दुर्गंधी येणाऱ्या अवयवांवर हलक्या हाताने घासा. पाणी कोरडं होऊ द्या आणि नंतर त्वचा धुवून एखादं चांगलं मॉइश्चरायजर लावू शकता.
तुरटीचं पावडर
तुरटीचं पावडर थोड्या पाण्यात टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अशा अवयवांवर लावा जिथे दुर्गंधी येत असेल. काही वेळ ही पेस्ट तशीच राहू द्या. नंतर त्वचा धुवून घ्या.
तुरटी आणि एसेंशिअल ऑईल
एसेंशिअल ऑईलमध्ये अॅंटी-सेप्टिक आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात जे बॅक्टेरिया नष्ट करण्यासोबतच त्वचाही तजेलदार ठेवतात आणि स्वच्छ ठेवतात. लॅवेंडर ऑईल आणि टी ट्री ऑईल दोन्हीही त्वचेसाठी फायदेशीर असतात. यांच्या मदतीने शरीराची दुर्गंधी दूर करण्यास मदत मिळते. अशात या तेलांमध्ये तुरटी मिक्स करू वापरल्यास शरीराची दुर्गंधी दूर होते. यांचा वापर कसा करावा हे जाणून घेऊ.
कसं कराल मिश्रण तयार?
तुरटी आणि एसेंशिअम ऑईलचं स्क्रब तयार करण्यासाठी तुरटीचं पावडर घ्या. लॅवेंडर किंवा टी ट्री ऑईल घ्या. एक वाटी घ्या. वाटीमध्ये तुरटी पावडर टाका. त्यात काही थेंब लॅवेंडर किंवा टी ट्री ऑईल टाका. दोन्ही गोष्टी चांगल्या मिक्स करून पेस्ट तयार करा.
आंघोळ केल्यानंतर तुम्ही कधीही ही पेस्ट शरीराच्या अशा अवयवांवर लावा जिथे दुर्गंधी येत असेल. त्या जागेवर हातांनी काही वेळ मसाज करा आणि नंतर पाण्याने धुवून घ्या.