चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करणारा खास ज्यूस, जाणून घ्या कसा कराल तयार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 12:03 IST2024-11-01T12:02:57+5:302024-11-01T12:03:38+5:30
Home made Juice for Skincare :तुम्हाला जर कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील आणि त्या दूर करायच्या असतील तर कोणतंही क्रीम लावण्याऐवजी तुम्ही नॅचरल उपाय करू शकता.

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करणारा खास ज्यूस, जाणून घ्या कसा कराल तयार!
Home made Juice for Skincare : धूळ, माती, प्रदूषण, कामाचा वाढता ताण, कमी झोप यामुळे जास्तीत जास्त लोकांना कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसण्याची समस्या होते. अशात तुम्हाला जर कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील आणि त्या दूर करायच्या असतील तर कोणतंही क्रीम लावण्याऐवजी तुम्ही नॅचरल उपाय करू शकता.
तुम्ही जर नियमितपणे एका खास ज्यूसचं सेवन केलं तर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार नाहीत. हे खास ज्यूस तुम्ही आवळा आणि बिटापासून तयार करू शकता. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. जर रोज हा ज्यूस प्यायले तर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार नाही आणि गालही टवटवीत होतील.
कसं तयार कराल?
आवळा आणि बिटाचा ज्यूस तयार करण्यासाठी सगळ्यात आधी 1 बीट, 1 आवळा, 3 चमचे चिया सीड्स, एक ग्लास पाणी आणि थोडा कोथिंबीर घ्या. त्यानंतर सगळ्यात आधी बीट, आवळा आणि कोथिंबीर बारीक करा. आता यात चिया सीड्स मिक्स करा आणि बारीक करून ज्यूस बनवा. घट्ट झाल्यावर यात थोडं पाणी टाका. नियमितपणे या 1 ग्लास ज्यूसचं सेवन केल्यास आठवड्याभरात तुम्हाला फरक दिसू लागेल.
बीट आणि आवळ्याच्या ज्यूसचे फायदे
सुरकुत्या दूर होतील
बीट आणि आवळ्यापासून तयार ज्यूस प्यायल्याने तुम्हाला सुरकुत्यांपासून सुटका मिळेल. यात अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. जे तुम्हाला खूप मदत करतात.
डाग दूर करण्यासाठी
या ज्यूसचं नियमितपणे सेवन केल्याने चेहऱ्यावरील सगळे डाग दूर होण्यास मदत मिळते. तसेच याच्या सेवनाने त्वचा हायड्रेट राहते.
त्वचा चमकदार करण्यास फायदेशीर
त्वचा चमकदार आणि ताजीतवाणी करण्यासाठी बीट आणि आवळ्याचा ज्यूस फायदेशीर ठरतो. याने रक्त शुद्ध होतं आणि बॅक्टेरियासोबत लढण्याची मदत मिळते.