मोहरीच्या तेलामध्ये मिक्स करून केसांना लावा या बीया, पांढरे केस लगेच होतील काळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 10:12 AM2022-11-30T10:12:10+5:302022-11-30T10:13:45+5:30
Mustard Oil And Fenugreek Seeds : मोहरीचं तेल आणि मेथीच्या दाण्यांमधील व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि अॅंटी-ऑक्सिडेंट केसांना पोषण देतात आणि केसा नॅच्युरली काळे होतात.
Mustard Oil And Fenugreek Seeds : पांढऱ्या केसांची समस्या आजकाल कमी वयातच भेडसावत आहे. पोषणाच्या कमतरतेमुळे तरूणपणीच केस पांढरे होत आहेत. केमिकल असलेले कलर केसांना काळे तर करतात, पण काही दिवसांनी पुन्हा तिच स्थिती येते. जर केसांना नॅच्युरली काळे करायचे असेल तर मोहरीचं तेल आणि मेथीचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. मोहरीचं तेल आणि मेथीच्या दाण्यांमधील व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि अॅंटी-ऑक्सिडेंट केसांना पोषण देतात आणि केसा नॅच्युरली काळे होतात.
कसा करावा वापर?
मोहरीचं तेल घ्या आणि गरम करा. यानंतर यात मेथीच्या दाण्यांचं पावडर मिक्स करा. पावडरचा रंग डार्क होईपर्यंत दोन्ही गरम करा. हे तेल कोमट करून केसांच्या मुळात लावा. 5 ते 6 तास हे तेल केसांना लावून ठेवा आणि मग केस धुवा. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. काही दिवसांनंतर तुम्हाला फरक दिसेल. तुमचे केस काळे होतील. तसेच केसगळतीही दूर होईल.
मेथीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स, अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. यात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असतं. तसेच मोहरीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. जे केसांना काळे करतात आणि केस मजबूत करतात.
मोहरी आणि मेथीचे फायदे
मोहरीचं तेल लावल्याने केस सुंदर होतात. जुन्या काळात लोक केसांना मोहरीचं शुद्ध तेल लावत होत्या. यामुळेच केसांचं आयुष्यही वाढत होतं आणि केस दाट, काळे व लांब होत होते. मोहरीच्या तेलामध्ये जर मेथीचे दाणे मिक्स करून लावलं तर दुप्पट फायदा मिळतो. हे तेल लावल्याने केस नॅच्युरल पद्धतीने काळे होतात.