लांब, मजबूत आणि मुलायम केसांसाठी लसूण आणि कांद्याच्या सालीचं खास तेल, जाणून घ्या कसं बनवाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 11:51 AM2024-10-31T11:51:19+5:302024-10-31T11:57:05+5:30
Hair Care : तुम्हीही केसांच्या वेगवेगळ्या समस्यांनी हैराण असाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास तेलाबाबत सांगणार आहोत.
Oil For Faster Hair Growth : आपल्या काही चुकांमुळे आजकाल कमी वयातच केस गळतात आणि पांढरे होतात. वेळीच यावर काही उपाय केले नाही तर लवकरच टक्कलही पडतं. तुम्हीही केसांच्या वेगवेगळ्या समस्यांनी हैराण असाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास तेलाबाबत सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही केसगळती थांबवू शकता, केस लांब, चमकदार आणि मजबूत ठेवू शकता.
केसांसाठी फायदेशीर हे खास तेल तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त लसूण आणि कांद्याच्या सालीची गरज पडेल. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक या साली कचऱ्यात फेकतात. पण त्या खूप फायदेशीर असतात.
तेल बनवण्यासाठी साहित्य
कांद्याची साल २ वाट्या
लसणाची साल १ वाटी
एक वाटी खोबऱ्याचं तेल
आल्याचे तुकडे १ वाटी
कसं तयार कराल तेल?
सगळ्यात आधी लसूण आणि कांद्याच्या सालीमध्ये आलं आणि खोबऱ्याचं तेल टाकून २० ते २५ मिनिटे शिजवा. शिजल्यानंतर खोबऱ्याच्या तेलाचा रंग बदलेल. नंतर हे तेल एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये स्टोर करा. या तेलाचा वापर तुम्ही २ महिन्यांपर्यंत करू शकता.
कसं वापराल हे खास तेल?
रात्री झोपण्याआधी लसूण आणि कांद्याच्या सालीचं हे तेल हलकं गरम करून केसांवर लावा. नंतर हलक्या हाताने मालिश करा. नंतर केस शाम्पूने धुवून घ्या. केस धुताना डोक्याची त्वचा जोरजोरात घासू नका. हे तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.
लसूण आणि कांद्याच्या सालीच्या तेलाचे फायदे
डोक्याच्या त्वचेला पोषण मिळेल
लसणाच्या सालीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-वायरस आणि अॅंटी-फंगल गुण आढळतात. जे डोक्याची त्वचा हेल्दी बनवण्यास मदत करतात.
कोंड्याची समस्या होईल दूर
जर तुमच्या केसांमध्ये नेहमीच कोंडा होत असेल तर कांदा आणि लसणाच्या सालीचं हे तेल खूप फायदेशीर ठरू शकतं. कांद्याच्या सालीमध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करतात.
आल्याने केस होतील मजबूत
आल्यातून केसांना भरपूर पोषण मिळतं. ज्यामुळे केसगळती, केस तुटणे अशा समस्या दूर होतात. नियमितपणे केसांना आल्याचा रस लावल्याने केस मजबूत आणि मुलायम होतात.
खोबऱ्याचं तेल केसांसाठी वरदान
जर तुम्ही केसगळतीच्या समस्येने हैराण अशाल तर खोबऱ्याचं तेल तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. कारण यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी, अॅंटी-मायक्रोबिअल आणि अॅंटी-ऑक्सीडेंट गुण आढळतात. जे केसांना मजबूत करण्यास मदत करतात.