पांढरे केस काळे करण्यासाठी असा तयार करा आवळ्याचा हेअरडाय, लगेच दिसून येईल फरक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 03:21 PM2024-10-16T15:21:39+5:302024-10-16T15:26:05+5:30
White Hair Home Remedies : आवळा पावडरच्या मदतीने तुम्ही केस काळे करू शकता. महत्वाची बाब म्हणजे यात कोणतंही केमिकलही नसतं.
White Hair Home Remedies : आजकाल वेगवेगळ्या कारणांनी कमी वयातच केस पांढरे होतात. याला शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल ही प्रमुख कारणे आहेत. अशात केस पुन्हा काळे करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय ट्राय करतात. तुम्हीही पांढरे झालेले केस काळे करण्याच्या प्रयत्नात असाल तर आम्ही तुम्हाला एक खास नॅचरल उपाय सांगणार आहोत. आवळा पावडरच्या मदतीने तुम्ही केस काळे करू शकता. महत्वाची बाब म्हणजे यात कोणतंही केमिकलही नसतं. आवळा पावडरचं हे हेअरडाय कसं तयार कराल हे जाणून घेऊ.
केस काळे करण्यासाठी आवळा हेअरडाय
आवळा पावडरमध्ये व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, कॅल्शिअम, आयर्न आणि फॉस्फोरस असतं. आवळ्याचं पावडर हे सुकवून बारीक करून तयार केलं जातं. याचं डाय तयार करण्यासाठी २ चमचे आवळा पावडर घ्या, त्यात थोडं चहा पावडरचं पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तयार झाल्यावर यात थोडा लिंबाचा रस टाका आणि चांगलं मिक्स करा. हा हेअरडाय नियमितपणे काही दिवस केसांवर लावल्या काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल.
आवळ्याचा रसही येईल कामी
पांढरे केस काळे करण्यासाठी आवळ्याचा रसही फायदेशीर ठरतो. आवळ्याचा रस पाण्यात मिक्स करून रोज प्यायल्याने केसांना आतून पोषण मिळतं. याने केस मुळापासून काळे होतात आणि मजबूत होतात. तसेच केसांची चांगली वाढही होते.
आवळ्याचं तेल
पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या तेलाचाही वापर करू शकता. आवळ्याचं तेल बाजारात सहजपणे मिळतं. हे तेल नियमित वापराल केस पांढरे होण्यास मदत मिळेल.