अनेक उपाय करूनही केसगळती थांबत नाही? लगेच करा हा एक नॅचरल उपाय, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 11:15 AM2024-09-07T11:15:39+5:302024-09-07T11:16:02+5:30
आज आम्ही तुम्हाला केसांसाठी लाल पाण्याचा कसा वापर करावा हे सांगणार आहोत. हा एक असा उपाय मानला जातो ज्याने तुमचे गेलेले केस परत येतील.
जास्तीत जास्त लोकांना आजकाल केसगळतीची समस्या भरपूर होते. कमी वयातच लोकांना टक्कल पडू लागलं आहे. अशात लोक केस पुन्हा येण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात किंवा केमिकल्सचा वापर करतात. मात्र, सगळ्यांनाच याने फायदा मिळतो असतं नाही. या गोष्टींचे अनेक साइड इफेक्ट्सही असतात. अशात आज आम्ही तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला केसांसाठी लाल पाण्याचा कसा वापर करावा हे सांगणार आहोत. हा एक असा उपाय मानला जातो ज्याने तुमचे गेलेले केस परत येतील. हे लाल पाणी तेल किंवा केमिकल्सची नाही तर नॅचरल गोष्टींचं असेल. हे पाणी केसांसाठी फार फायदेशीर असतं.
केसांसाठी लाल पाणी
केसांसाठी हे खास लाल पाणी तयार करण्यासाठी तुम्हाला बिटाची गरज लागेल. बिटाच्या लाल पाण्याने केस मजबूत होतात आणि केसगळती कमी होते. चला जाणून घेऊ हे पाणी बनवण्यासाठी काय काय लागतं.
लाल पाणी बनवण्यासाठी वस्तू
अर्ध कापलेलं बीट, एक चमचा मेथीचे दाणे, १० ते १५ कढीपत्ते, रोजमेरीची काही पाने, दोन ग्लास पाणी.
कसं कराल तयार?
सगळ्यात आधी बीट बारीक करा. त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका वाटीमध्ये ठेवा.
आता एक पातेलं घ्या आणि त्यात कापलेलं बीट, मेथीचे दाणे, कढीपत्ता, रोजमेरीची पाने आणि दोन ग्लास पाणी टाकून उकडायला ठेवा.
हे पाणी तोपर्यंत उकडू द्या जोपर्यंत पाणी गर्द लाल होत नाही. त्यानंतर गॅस बंद करा. नंतर हे पाणी थंड झाल्यावर एका स्प्रे बॉटलमध्ये टाका.
केसांवर कसं लावाल हे पाणी?
हे लाल पाणी तुम्ही केसांवर दोन पद्धतीने वापरू शकता. पहिली पद्धत म्हणजे स्प्रे बॉटलने आधी हे पाणी डोक्याची त्वचा आणि केसांवर स्प्रे करा. तसेच त्यानंतर हलक्या हाताने केसांची मसाजही करा. हे पाणी जवळपास ३० मिनिटे केसांवर असंच राहू द्या.
जेव्हा केस धुण्याची वेळ येईल तेव्हा एका वाटीमध्ये लाल पाणी घ्या आणि त्यात तुम्ही वापरता ते शाम्पू टाका. ३ मिनिटे याने केस चांगले स्वच्छ करा. नंतर पाण्याने केस धुवून घ्या. केसगळतीची समस्या काही दिवसांमध्ये कमी होईल.
लाल पाण्याचे केसांना फायदे
या उपायामध्ये सगळ्या नॅचरल गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. जसे की, मेथी, कढीपत्ता, रोजमेरीची पाने. मेथीच्या बियांनी केसांना पोषण मिळतं आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. ज्यामुळे केसांची वाढ होते.