दाट, चमकदार, लांब केसांसाठी कॉफीचा 'असा' करा वापर, काही दिवसात बदलेल केसांचा चेहरा-मोहरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 11:15 AM2024-10-26T11:15:49+5:302024-10-26T11:21:55+5:30
Coffee For Hair Growth : कॉफीचा वापर तुम्ही केस हेल्दी ठेवण्यासाठीही करू शकता. केसांना कॉफी लावल्याने केस मजबूत होतात आणि त्यांची वाढही वेगाने होते.
Coffee For Hair Growth : जास्तीत जास्त लोक रोज दिवसाची सुरूवात एक कप कॉफीने करतात. कॉफी टेस्ट आणि आरोग्य दोन्ही दृष्टीने फायदेशीर ठरते. एक कॉफीने अनेकांना दिवसभरासाठी एनर्जी मिळते. कॉफीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. कॉफीने हृदयाचं आणि लिव्हरचं आरोग्यही चांगलं राहतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कॉफी केसांसाठीही फायदेशीर असते. तेच आम्ही सांगणार आहोत.
कॉफीचा वापर तुम्ही केस हेल्दी ठेवण्यासाठीही करू शकता. केसांना कॉफी लावल्याने केस मजबूत होतात आणि त्यांची वाढही वेगाने होते. त्याशिवाय केस दाट होतात आणि चमकादरही होतात. फक्त तुम्हाला यासाठी कॉफीचा वापर कसा करावा हे माहीत असलं पाहिजे. चला तर जाणून घेऊ.
केसांना कॉफी लावण्याची पद्धत
कॉफीचा हेअर मास्क
2 चमचे कॉफी पावडर घ्या आणि यात 1 कप दही किंवा एलोवेरा जेल मिक्स करा. आता ही पेस्ट केसांच्या मूळात आणि केसांना लावा. 30 ते 40 मिनिटांनंतर एखाद्या माइल्ड शाम्पूने केस धुवून घ्या. या मास्कने केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस मुलायम होतात.
कॉफी स्प्रे
कॉफी स्प्रे बनवण्याची पद्धत फारच सोपी आहे. कॉफी पावडर नॉर्मल पाण्यात मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि केसांवर स्प्रे करून मसाज करा. 15 ते 20 मिनिटांनंतर केस शाम्पूने धुवून घ्या.
कॉफीचा स्क्रब
कॉफी स्क्रब तयार करण्यासाठी 1 चमचा कॉफी पावडरमध्ये 1 चमचा मध आणि 2 मोठे चमचे खोबऱ्याचं तेल मिक्स करा. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेवर लावून 10 मिनिटे मालिश करा. नंतर शाम्पूने केस धुवून घ्या. याने केसांची वाढ चांगली होते.
कॉफीपासून बनवा हेअर ऑईल
2 चमचे कॉफी पावडर खोबऱ्याच्या तेलात टाकून हलकी गरम करा. थंड झाल्यावर हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर लावा आणि 1 ते 2 तासांनी केस शाम्पूने धुवून घ्या. याने केस मजबूत होतील आणि केसगळतीही कमी होईल.