केसगळतीची आणि कोंड्याची समस्या लगेच होईल दूर, कढीपत्त्याचा 'असा' करा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 12:01 PM2024-10-11T12:01:47+5:302024-10-11T12:03:32+5:30
Curry Leaves For Hail Fall : आज आम्ही तुम्हाला केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी एक नॅचरल उपाय सांगणार आहोत.
Curry Leaves For Hail Fall : आजकाल चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे कमी वयात लोकांना केसगळतीच्या समस्येचा सामना करावा लागतो. केसगळतीची कारणे वेगवेगळी आहेत. मात्र, उपाय म्हणून वापरले जाणारे केमिकल्स अधिक घातक ठरतात. अशात आज आम्ही तुम्हाला केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी एक नॅचरल उपाय सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता.
कढीपत्त्याचा वापर भारतीय घरांमध्ये रोज वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. केसांसंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर ठरतो. अशात याचे फायदे आणि वापर कसा करावा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कढीपत्त्याचे फायदे
कढीपत्त्यामधील व्हिटॅमिन केसांच्या मुळात जाऊन मजबूती देतात आणि यामुळे केसगळती कमी होते. यातील अमीनो अॅसिड केसांच्या फॉलिकल्सला मजबूत करतं. तेच बेटा-कॅरोटीन, प्रोटीन केसांचं आरोग्य चांगलं ठेवतं आणि केस चमकदार होतात. कढीपत्त्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल, अॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे केसात होणारी कोंड्याची समस्या लगेच दूर होते.
कसा कराल वापर
- खोबऱ्याच्या तेलात ७ ते ८ कढीपत्त्याची पाने टाकून तेल कोमट करा. हे तेल डोक्याच्या त्वचेवर व्यवस्थित लावा. रात्रभर तेल तसंच केसांना राहू द्या आणि सकाळी केस पाण्याने व शॅम्पूने धुवावे.
- खोबऱ्याच्या तेलात काही कढीपत्त्याची पाने आणि ५ ते ६ मेथीचे दाणे टाकून तेल गरम करा. नंतर तेल थंड झाल्यावर केसांना लावा.
- ताजी कढीपत्त्याची पाने पेस्ट करून दह्यात टाका आणि त्यात काही ऑलिव ऑइलचे किंवा बदामाच्या तेलाचे थेंब टाका. हे मिश्रण केसांसाठी फायदेशीर ठरतं. आता ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावा आणि २० ते २५ मिनिटांनी केस शॅम्पूने धुवावे.
- कढीपत्त्याची पाने भाजा आणि तुम्ही वापरता त्या हेअर ऑइलमध्ये बारीक करून मिश्रित करा. हे तेल रोज डोक्याच्या त्वचेला लावून झोपा. सकाळी केस कोमट पाण्याने धुवा.