डोळ्याखालचे काळे डाग आणि सुरकुत्या दूर करेल बटाट्याचा रस, जाणून घ्या कसा वापराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 03:23 PM2024-09-27T15:23:33+5:302024-09-27T15:42:12+5:30

Potato juice for Dark Circle : बटाट्याचा वापर करून तुम्ही डार्क सर्कल म्हणजे डोळ्याखालील काळे डागही दूर करू शकता.

How to use potato to remove eye dark circles | डोळ्याखालचे काळे डाग आणि सुरकुत्या दूर करेल बटाट्याचा रस, जाणून घ्या कसा वापराल!

डोळ्याखालचे काळे डाग आणि सुरकुत्या दूर करेल बटाट्याचा रस, जाणून घ्या कसा वापराल!

Dark Circle : जास्तीत जास्त लोक रोज वेगवेगळ्या प्रकारे बटाट्यांचं सेवन करत असतात. बटाटे खाण्याचे आरोग्याला अनेक फायदेही होतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, बटाट्याचा वापर करून तुम्ही डार्क सर्कल म्हणजे डोळ्याखालील काळे डागही दूर करू शकता. यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर कसा कराल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डार्क सर्कल कमी करणारा बटाट्याचा रस

बटाट्याचा वापर करून डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर करण्यास मदत मिळते. बटाटे आणि काकडीचा रस समान प्रमाणात एकत्र करून डोळ्याच्या आजूबाजूला लावा. याने फायदा होईल. तसेच बटाट्याच्या रसात काही थेंब लिंबाचा रस टाकूनही तुम्हाला फायदा मिळू शकतो.

त्वचेला होणारे इतर फायदे

१) बटाटे आणि अंड्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सैलपणा दूर होऊन त्वचा तरूण दिसू लागते. अर्धा बटाट्याचा रस घ्या, त्यात अंड्याचा पांढरा भाग टाका आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. अर्धा तास हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. 

२) अर्ध्या बटाट्याच्या रसात दोन चमचे दूध मिश्रित करा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण चेहऱ्यावर तसंच अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा. याने चेहरा ताजातवाणा आणि तरूण दिसेल. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरावा. 

३) त्वचेवर डाग दूर करण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरतो. पूर्वी त्वचेवरील खाज दूर करण्यासाठी बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावला जात होता. बटाट्याचे स्लाइस त्वचेवरील रॅशेज आणि इरिटेशन सारखी समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतात.

४) बटाटाच्या रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. तसेच गरमीने खराब झालेल्या चेहऱ्याला आराम मिळतो आणि डाग दूर होण्यास मदत मिळते.

Web Title: How to use potato to remove eye dark circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.