त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी मध व हळदीचा असा करा वापर, महागडे क्रीम विसराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 12:27 PM2024-11-04T12:27:16+5:302024-11-04T12:27:57+5:30

Glowing Skin Tips : हळद आणि मधाचा वापर करुन तुम्ही त्वचेचा चमकदारपणा कायम ठेवू शकता. यासाठी काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

How to use turmeric and honey in winter season remain glowing skin | त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी मध व हळदीचा असा करा वापर, महागडे क्रीम विसराल!

त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी मध व हळदीचा असा करा वापर, महागडे क्रीम विसराल!

Glowing Skin Tips :  हिवाळ्यात त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या अनेकांना हैराण करत असतात. त्वचा कोरडी होणे, उलणे, रॅशेज येणे, टाचांना भेगा पडणे अशा समस्या होतात. अशात लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. वेगवेगळी महागडी उत्पादने वापरली जातात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, त्वचेची काळजी घेण्यासाठी महागडी उत्पादने न वापरता कमी खर्चातही तुम्ही त्वचा चांगली ठेवू शकता. यासाठी तुम्ही हळद आणि मधाचा वापर करू शकता. हळद आणि मधाचा वापर करुन तुम्ही त्वचेचा चमकदारपणा कायम ठेवू शकता. यासाठी काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

मध आणि हळद त्वचेसाठी फायदेशीर

त्वचा चमकदार करण्यासाठी अर्धा चमचा हदळ पावडर आणि अर्धा चमचा मध एक ग्लास पाण्यात मिश्रित करा. हे पाणी बर्फाच्या ट्रेमध्ये टाकून फ्रिजरमध्ये ठेवा. दोन तासांनी याच्या आइस क्यूब तयार होतील. या आइस क्यूब दोन मिनिटांपर्यत चेहऱ्यावर फिरवा. 

याने त्वचेचा चमकदारपणा वाढतो आणि त्वचा मुलायम होते. त्वचेवरील मृत पेशीही दूर होतात, रंग उजळतो, त्वचा टाइट होते, चेहऱ्यावरील डाग दूर होतात. तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासही याने मदत होते. 

इतरही काही उपाय

१) लिंबाचा रस आणि दही मधात मिश्रित करुन लावल्याने टॅनिंग दूर होते. 

२) मध, हळद आणि गुलाबजल एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्याने चेहरा अधिक उजळतो. 

३) मध, बेकिंग सोडा एकत्र करुन हात आणि पायांवर लावल्यास त्वचेवरील मृत पेशी दूर होतात. 

४) मध आणि दालचीनीची पावडर एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स दूर होतात.

५) मध आणि खोबऱ्याचं तेल मिश्रित करून त्वचेवर लावल्यास त्वचेवरील डाग कमी होतात. 

६) बटाट्याच्या पेस्टमध्ये मध मिश्रित करून त्वचेवर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

Web Title: How to use turmeric and honey in winter season remain glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.