मुलतानी माती केवळ चेहऱ्यासाठी नाही तर केसांसाठीही आहे वरदान!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 11:49 AM2019-01-01T11:49:01+5:302019-01-01T11:52:45+5:30

महिलांना केसगळतीसोबतच आणखी एका गोष्टीची नेहमी भीती असते ती म्हणजे डॅंड्रफची. केसा वेगवेगळ्या कारणांनी सतत होणारा कोंडा हा अनेकांसाठी डोकेदुखीचच कारण आहे.

How use multani mati treating dandruff at home | मुलतानी माती केवळ चेहऱ्यासाठी नाही तर केसांसाठीही आहे वरदान!

मुलतानी माती केवळ चेहऱ्यासाठी नाही तर केसांसाठीही आहे वरदान!

Next

(Image Credit : lifealth.com)

महिलांना केसगळतीसोबतच आणखी एका गोष्टीची नेहमी भीती असते ती म्हणजे डॅंड्रफची. केसा वेगवेगळ्या कारणांनी सतत होणारा कोंडा हा अनेकांसाठी डोकेदुखीचच कारण आहे. त्यामुळे या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. त्यामुळे आम्हीही तुमच्यासाठी एक खास उपाय घेऊन आलो आहोत.

जेव्हा केसांची काळजी घेण्याचा विषय निघतो तेव्हा घरगुती उपाय सर्वात चांगले मानले जातात. यात पैशांची बचतही होते आणि याचे नुकसानही कमी असतात. मुलतानी माती हा असाच एक चांगला उपाय आहे. आम्ही तुम्हाला मुलतानी मातीच्या मदतीने केसांची काळजी कशी घ्यावी हे सांगणार आहोत. या मातीचा वापर करुन तुम्ही केसगळती आणि डॅंड्रफची समस्या दूर करु शकता.

साहित्य

४ चमचे मुलतानी माती

२ चमचे लिंबाचा रस

१ चमचा दही

१ चमचा बेकिंग सोडा

कसा तयार कराल मास्क?

एका बाऊलमध्ये मुलतानी माती घ्या आणि त्यात लिंबाचा रस टाका. हे चांगल्याप्रकारे मिश्रित करा. आता यात दही मिश्रित करा. आता त्यात बेकिंग सोडा टाकून थोडी घट्ट पेस्ट तयार करा. गरज असल्यात यात थोडं पाणी टाका. 

कशी लावाल पेस्ट

केसांना ही पेस्ट ब्रशच्या मदतीने व्यवस्थित लावा. त्यासाठी केसांना छोट्या छोट्या भागात वेगळं करा. केसांना पूर्णपणे ही पेस्ट लावून झाल्यावर शॉवर कॅप घाला. साधारण ३० मिनिटे ही पेस्ट अशीच ठेवा. त्यानंतर तुम्ही नेहमी वापरत असलेल्या शॅम्पूने केस धुवा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापराल तर याचा फायदा अधिक बघायला मिळेल.

मुलतानी मातीचे फायदे

मुलतानी माती तुमच्या डोक्यावरील तेलाला, चिकटपणाला स्वच्छ करते. याने डॅंड्रफही लगेच दूर होतात. लिंबाच्या रसामध्ये एंटीमायक्रोबिअल गुण असतात, जे डॅंड्रफ दूर करण्यास मदत करतात. तर दह्याने डोक्याच्या त्वचेवरील बॅक्टेरिया दूर केला जातो. याने डोकं खाजवण्याची समस्याही दूर होते. तसेच बेकिंग सोडा डोक्याच्या त्वचेच्या फंगससोबत लढतो.

Web Title: How use multani mati treating dandruff at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.