टूथपेस्टच्या मदतीने असे दूर करा त्वचेवरील नको असलेले केस!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 11:07 AM2019-08-30T11:07:05+5:302019-08-30T11:07:26+5:30
जेव्हा तुम्ही त्वचेवरील हे नको असलेले केस दूर करण्यासाठी वॅक्सिंग किंवा थ्रेडचा वापर करत असाल तर यात फार वेदना होतात.
त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी त्वचेवरील नको असलेले केस दूर करणे गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही त्वचेवरील हे नको असलेले केस दूर करण्यासाठी वॅक्सिंग किंवा थ्रेडचा वापर करत असाल तर यात फार वेदना होतात. अशात त्वचेवरील नको असलेले केस दूर करण्यासाठी घरगुती उपाय करू शकता.
वेदना न होता त्वचेवरून केस दूर करण्यासाठी बाजारात अनेक क्रीम उपलब्ध आहेत. पण त्यात केमिकल्स असल्याने ते त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. तुम्ही केवळ टूथपेस्टमध्ये काही वस्तू मिश्रित केल्या तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.
आवश्यक साहित्य
१ चमचा टूथपेस्ट
४ ते ५ चमचे दूध
२ चमचे बेसन
कसं कराल तयार?
पेस्ट तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये बेसन आणि टूथपेस्ट मिश्रित करा. यासाठी पांढऱ्या टूथपेस्टचा वापर करा. या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानंतर त्यात दूध टाकून पेस्ट तयार करा. पेस्ट जास्त घट्ट झाली असेल तर त्यात आणखी दूध टाका. तुमची हेअर रिमुव्हल क्रीम तयार आहे.
कसं वापराल?
याचा वापर करण्यासाठी सर्वातआधी पेस्ट त्या जागेवर जेथील केस तुम्हाला काढायचे आहेत. पेस्ट लावल्यावर कॉटन पॅड किंवा कॉटन बॉलच्या मदतीने पेस्ट रब करा. उलट्या दिशेने केसांना रब करा. ही प्रक्रिया २ ते ३ वेळा करा. जेव्हा त्वचेवरून केस पूर्णपणे निघतील तेव्हा त्वचा पाण्याचे धुवा. तसेच केस साफ केल्यावर त्वचेवर मॉइश्चरायजर लावा.
(टिप : वरील सल्ले किंवा उपाय हे केवळ माहितीसाठी देण्यात आले आहेत. यांचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण काही लोकांना याची अॅलर्जी असू शकते. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)