कलर्ड आयलायनर लावताना अशी घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 08:13 PM2018-12-20T20:13:38+5:302018-12-20T20:29:05+5:30

सध्या काळ्या आयलायनरऐवजी कलर्ड आयलायनर ट्रेन्डमध्ये आहे. परंतु कलर्ड आयलायनर वापरताना फार काळजी घ्यावी लागते. थोडं जरी दुर्लक्ष केलतं तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा लूक बिघडू शकतो.

How to wear coloured eyeliner | कलर्ड आयलायनर लावताना अशी घ्या काळजी!

कलर्ड आयलायनर लावताना अशी घ्या काळजी!

Next

सध्या काळ्या आयलायनरऐवजी कलर्ड आयलायनर ट्रेन्डमध्ये आहे. परंतु कलर्ड आयलायनर वापरताना फार काळजी घ्यावी लागते. थोडं जरी दुर्लक्ष केलतं तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा लूक बिघडू शकतो. आज आम्ही तुम्हाला कलर्ड आयलायनर लावण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही कलर्ड आयलायनर वापरून तुमचा लूक आणखी बेटर करू शकता. 

डोळ्यांच्या बाहेरील कडेपासून करा सुरुवात 

कोणतंही आयलायनर लावताना ते डोळ्यांच्या बाहेरील कडेपासून लावा. जर तुम्ही कलर्ड आयलायनर वापरत असाल तर ही गोष्ट कटाक्षाने पाळा. आतल्या कडेपासून सुरुवात केल्यामुळे आयलायनर जाड लाइनमध्ये लागतं. त्यामुळे लूक बिघडतो. 

पेन्सिल आयलायनरचा वापर करणं योग्य

लिक्विड आयलायनर लावणं थोडं अवघड असतं. जरा दुर्लक्ष झालं तर ते डोळ्यांमध्येही जाऊ शकतं. त्याऐवजी पेन्सिल आयलायनरचा वापर करणं योग्य ठरतं. हे तुम्ही व्यवस्थित लावू शकता आणि डोळ्यात जाण्याची भितीही नसते. 

स्किन टोननुसार निवडा आयलायनर 

सुंदर दिसण्यासाठी त्वचेचा रंग कोणताही असला तरिही फरक पडत नाही. पण तुम्ही मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करताना त्वचेचा रंग आणि प्रकार लक्षात घेणं गरजेचं असतं. आयलायनर निवडतानाही स्किन टोन लक्षात घेणं गरजेचं ठरतं. 

लिक्विड आयलायनर लावताना योग्य ब्रश वापरा

जर तुम्ही लिक्विड आयलायनर वापरणार असाल तर ते लावण्यासाठी योग्य ब्रशची निवड करा. कोणतंही आयलायनर लावताना योग्य ब्रश वापरला तर लूक चांगला दिसण्यास मदत होते.

Web Title: How to wear coloured eyeliner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.