रेड लिपस्टिक लावणं फार कठीण जातंय? 'या' टिप्स फॉलो करून मिळवा परफेक्ट लूक!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 11:04 AM2018-09-03T11:04:10+5:302018-09-03T11:18:11+5:30
चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये ओठांची मोठी भूमिका असते. त्यातही लिपिस्टिक लावणं हा एक टास्क असतो. अशातच जर तुम्ही लावत असेलेली लिपस्टिक जर रेड कलरची असेल तर ती लावणं म्हणजे एक चॅलेंजच.
चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये ओठांची मोठी भूमिका असते. त्यातही लिपिस्टिक लावणं हा एक टास्क असतो. अशातच जर तुम्ही लावत असेलेली लिपस्टिक जर रेड कलरची असेल तर ती लावणं म्हणजे एक चॅलेंजच. लिपस्टिक लावताना जरासाही हात इकडे तिकडे गेला तर पूर्ण मेकअप बिघडू शकतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला रेड लिपस्टिक लावण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. त्या फॉलो करून तुम्ही व्यवस्थित लिपस्टिक लावू शकता. ज्यामुळे तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडेल.
रेड लिपस्टिक परफेक्ट पद्धतीने लावण्यासाठी खाली दिलेल्या 7 गोष्टी गरजेच्या आहेत...
1. लिप बाम
2. रेड लिपस्टिक
3. लिप लायनर ब्रश
4. लिप ब्रश
5. कंसीलर
6. फेस पाउडर
7. टिश्यू पेपर
स्टेप 1:
सर्वात आधी आपल्या ओठांवर बोटांच्या मदतीने लिप बाम लावा. काही वेळानंतर ओठ सुकू लागतील, त्यानंतर टिश्यू पेपरच्या मदतीने हलक्या हाताने ओठांवरील लिप बाम पुसून टाका.
स्टेप 2:
लिप बाम काढून टाकल्यानंतर ओठांवर थोडी पावडर लावा. पण जास्त पावडर लावू नका, नाहीतर लिपस्टिक लावल्यानंतर ओठांवर पॅचेस दिसून येतील.
स्टेप 3:
आता लिप ब्रशवर लिपस्टिक घ्या आणि ती ओठांवर लावा. ओठ मोठे दाखवायचे असल्यास लिपस्टिक लावण्याआधी ओठांचा शेप लिप पेन्सिलच्या मदतीने अंडरलाइन करून घ्या. त्यानंतर लिपस्टिक लावा.
स्टेप 4:
लिपस्टिक लावून झाल्यानंतर लिप पेन्सिल किंवा लिप लाइनर ब्रशच्या मदतीने ओठांना परफेक्ट शेप द्या.
स्टेप 5:
आता एक टिशू पेपर घ्या आणि ओठांमध्ये ठेवून ओठ त्यावर प्रेस करा. असं केल्याने लिपस्टिक लावताना ओठांवर जे पॅचेस पडतात ते टिशू पेपरला लागतील आणि निघून जातील. त्यामुळे ओठांना एक स्मूथ फिनिश मिळण्यास मदत होईल.
स्टेप 6 :
एका ब्रशवर कंसिलर घ्या आणि दोन्ही ओठांच्या किनाऱ्यांवर तसेच लिपस्टिक ओठांच्या आजूबाजूच्या त्वचेवर लागली असेल तर तिथे हे कंसिलर लावा.
स्टेप 7:
त्यानंतर लिपस्टिक दातांवर तर लागली नाही ना? हे चेक करा. तसे असल्यास टिशू पेपरच्या मदतीने दातांवर लागलेली लिपस्टिक पुसून टाका.