वजन कमी केल्यानंतर आलेले स्ट्रेच मार्क्स कसे दूर कराल?; जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 05:36 PM2019-09-04T17:36:14+5:302019-09-04T17:37:01+5:30

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री झरिन खान हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये ती फार सुंदर दिसत होती. पण तरिसुद्धा ती ट्रोल झाली. कारण होतं तिच्या पोटावर दिसणारे स्ट्रेच मार्क्स.

This is how you can prevent stretch marks after weight loss | वजन कमी केल्यानंतर आलेले स्ट्रेच मार्क्स कसे दूर कराल?; जाणून घ्या उपाय

वजन कमी केल्यानंतर आलेले स्ट्रेच मार्क्स कसे दूर कराल?; जाणून घ्या उपाय

googlenewsNext

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री झरिन खान हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये ती फार सुंदर दिसत होती. पण तरिसुद्धा ती ट्रोल झाली. कारण होतं तिच्या पोटावर दिसणारे स्ट्रेच मार्क्स. अनेकदा गरोदर पणानंतर पोटावर स्ट्रेच मार्क्स येतात ही गोष्ट अत्यंत कॉमन आहे. अनेकदा तर वजन कमी केल्यानंतरही पोटावर स्ट्रेच मार्क्स दिसून येतात. स्ट्रेच मार्क्स येणं ही खरं तर नॅचरल प्रोसेस आहे. पण अनेकदा हेच स्ट्रेच मार्क्स तुमचा लूक बिघडवण्याचं काम करतात. 

जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींवर लक्षं देणं आवश्यक आहे. त्यातील एक गोष्ट म्हणजे, स्ट्रेच मार्क्स. पुरूष असो किंवा महिला दोघांनाही स्ट्रेच मार्क्स येतात. अनेकदा हे स्ट्रेच मार्क्स पोट, कंबर, स्तन या अवयवांवरील त्वचेवर येतात. पण या स्ट्रेच मार्क्सपासून सुटका करणं खरचं सोपं आहे. त्यासाठी फक्त काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. 

हेल्दी डाएट 

तुम्हाला हेल्दी खाण्यावर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. जेवणामध्ये अशा पदार्थांचा समावेश करावा. ज्यांमध्ये भरपूर झिंक आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असेल. हे न्यूट्रियंट्स कोलेजन तयार करण्यासाठी मदत करतात. कोलेजन एक प्रकारचं प्रोटीन आहे. जे स्किनची इलास्टिसिटी मेन्टेन करण्यासाठी मदत करतं. 

भरपूर पाणी प्या 

जर तुम्हाला स्ट्रेच मार्क्स दूर करायचे असतील तर पाणी तुम्हाला मदत करेल. हे फक्त तुमची त्वचाच नाहीतर संपूर्ण आरोग्यासाठी बेस्ट गिफ्ट आहे. पाण्यामुळे तुमची स्किन हायड्रेट आणि हेल्दी होण्यास मदत होते. 

स्ट्रेचिंग 

जर तुम्ही फक्त डायटिंग करून वेट लॉस करण्याचा प्रयत्न करत असाल तर थोडा व्यायाम आणि स्ट्रेचिंगही करा. दररोज 15 ते 20 मिनिटं एक्सरसाइज केल्याने ब्लड सर्क्युलेशन आणि स्किन इलास्टिसिटी मेन्टेन करण्यासाठी मदत होते. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: This is how you can prevent stretch marks after weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.