परफेक्ट फिगर हवा असेल तर फॉलो करा 'या' १० टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 11:39 AM2019-05-22T11:39:31+5:302019-05-22T11:41:46+5:30
परफेक्ट फिगर मिळवणं ही प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात महिलांमध्ये हार्मोनल बदल होत राहतात.
परफेक्ट फिगर मिळवणं ही प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात महिलांमध्ये हार्मोनल बदल होत राहतात, त्यामुळे त्यांना परफेक्ट फिगर मिळवणं आव्हानात्मक ठरतं. अनेकदा तर असंही बघायला मिळतं की, नेहमी वर्कआउट करूनही महिला हवा तसा फिगर मिळवू शकत नाहीत. वाढतं वय, गर्भावस्था, काही आजार, मेनोपॉजमुळेही वजन वाढत राहतं. तरी सुद्धा तुम्हाला परफेक्ट फिगर हवा असेल तर काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
किती कॅलरींची असते गरज
महिलांच्या शरीरात जवळपास १२०० कॅलरी आणि पुरूषांच्या शरीराला जवळपास १५०० कॅलरींची गरज असते. अशात काही टिप्सच्या माध्यमातून तुम्ही बॉडी फिट ठेवण्यासाठी कॅलरी कमी घेण्यासोबतच दैनंदिन अॅक्टिव्हिटीला वाढवण्याची गरज असेल. जसे की, रोज पायी चालणे आणि लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करणे.
फॉलो करू शकता या टिप्स
१) कच्ची फळे आणि भाज्या सलाद स्वरूपात खाऊ शकता. याने तुमच्या शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर मिळेल. फायबरमुळे तुमची पचनक्रिया योग्यप्रकारे काम करेल. तसेच याने जाडेपणा आणि हृदयासंबंधी समस्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासही मदत मिळते.
२) नियमितपणे व्यायाम करण्याला पर्याय नाही. रोज साधारण २० ते ४० मिनिटे ब्रिक्स वॉकिंग(वेगाने चालणे) करा. वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी एरोबिक सुद्धा करू शकता.
३) दैनंदिन आहारात हिरव्या भाज्या, फळं आणि कडधान्याचा समावेश करा.
४) कॉम्लेक्स कार्बोहायड्रेट फूडचं सेवन जास्त करा, जसे की, गहू, ज्वारी आणि बाजरी यांचा आहारात समावेश करा.
५) मैदा आणि त्यापासून तयार पदार्थ जसे की, ब्रेड नूडल्स, मॅकरॉनी आणि पास्ता खाणे टाळा.
६) फॅट आणि कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ कमी खावीत. अंडी, डेअरी प्रॉडक्ट, लोणी, तूप, खोबऱ्याचं तेल यांचा आहारात समावेश करा.
७) गोड पदार्थ किंवा साखर कमी खावी. यातील फ्रक्टोजमुळे आरोग्याचं वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होतं.
८) अनेकजण पदार्थांमध्ये आधीच मीठ घातलेलं असताना वरूनही मीठ घेतात. पण मिठाने तुम्हाला अनेक समस्या होतात.
९) दिवसभर थोडं थोडं खावं. एकाचवेळी जास्त पोट भरू नका.
१०) जेवण तयार करताना किंवा टीव्ही बघताना जेवण करू नका. रोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.
(टिप : वरील सर्व टिप्स केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच शरीरासाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)