उन्हाळ्यात रोज रात्री आंघोळ केल्याने पडणार नाही आजारी, होतात हे ४ फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 10:33 AM2019-05-03T10:33:28+5:302019-05-03T10:47:20+5:30

उन्हाळ्यात बाहेरच्या तापमानासोबतच शरीराचं देखील तापमान वाढतं. सद्या उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे. अशात या घाबरवून सोडणाऱ्या उन्हात तुमची हालत खराब होत आहे.

If you take bath in the night in summer you will get these 4 benefits | उन्हाळ्यात रोज रात्री आंघोळ केल्याने पडणार नाही आजारी, होतात हे ४ फायदे!

उन्हाळ्यात रोज रात्री आंघोळ केल्याने पडणार नाही आजारी, होतात हे ४ फायदे!

Next

(Image Credit : newstracklive.com)

उन्हाळ्यात बाहेरच्या तापमानासोबतच शरीराचं देखील तापमान वाढतं. सद्या उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे. अशात या घाबरवून सोडणाऱ्या उन्हात तुमची हालत खराब होत आहे. दिवसभर येणारा घाम आणि घामाची दुर्गंधी हैराण करून सोडते. सकाळी आंघोळ करून घराबाहेर निघाल्यावरही काही वेळात अंग घामाने भिजून जातं. त्यामुळे शरीरावर धुळ-माती चिकटते.

(Image Credit : Fuel PR)

काही लोक रात्री घरी जाऊन पुन्हा आंघोळ करून रिलॅक्स होतात तर काही लोक केवळ हात-पाय, तोंड धुवून रिलॅक्स होतात. या दिवसात तुम्ही जर रात्रीही आंघोळ करत नसाल तर तुम्हाला त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सोबतच याने तुम्हाला झोपली चांगली येऊ शकत नाही. रात्री आंघोळ करण्याचे काही फायदेही आहेत ते जाणून घेऊया. 

(Image Credit : AIA Malaysia)

१) हृदय राहतं निरोगी - रात्रीच्यावेळी शरीरात ब्लड सर्कुलेशन धीम्या गतीने होतं, त्यामुळे तुम्ही जर रात्रीच्यावेळी थंड पाण्यान आंघोळ कराल तर शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. अर्थातच याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. हृदय नेहमी निरोगी ठेवण्यासाठी रोज रात्री आंघोळ करण्याची सवय लावून घ्या.

२) फ्रेश वाटेल - उन्हाळ्याच्या दिवसात धुळ, माती आणि घामामुळे तुम्ही हैराण झालेले असतात. घामामुळे चिकटपणा  येतो आणि शरीर खायवायला लागतं. तसेच केसांमध्ये घामामुळे समस्या होते. अशात जर तुम्ही रोज रात्री घरी जाऊन आंघोळ केली तर शरीरावर साचलेली धुळ-माती निघून जाते आणि घामामुळे आलेला चिकटपणाही दूर होतो. त्यामुळे आंघोळ केल्यावर तुम्हाला फ्रेश आणि ताजंतवाणं वाटू लागतं. त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये साचलेली धुळ निघून जाते आणि त्वचेवर ग्लो दिसतो. 

(Image Credit : The Sleep Judge)

३) झोप चांगली येते - उन्हाळ्यात उष्णतेमुळे इतर दिवसांपेक्षा अधिक थकवा आणि तणाव जाणवतो. त्यामुळे आरोग्य धोक्यात येतं. शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रिया बदलून जातात. त्यात झोपेचीही समस्या मुख्य आहे. एकतर गरमीमुळे आणि दुसरं म्हणजे शरीरातील उष्णतेमुळे लवकर झोप येत नाही. पण रात्री आंघोळ कराल तर तुम्हाला बेडवर पडल्या पडल्या चांगली झोप लागेल. 

४) इम्यूनिटी वाढते - या दिवसात अधिक उष्णतेमुळे अनेक गंभीर आजार होण्याचाही धोका असतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. पण रोज रात्री जर आंघोळ कराल तर तुमची इम्यूनिटी वाढू शकते. याने तुमची वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. 

Web Title: If you take bath in the night in summer you will get these 4 benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.