लांब आणि चमकदार केसांसाठी करा 'हा' सोपा उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 02:57 PM2019-05-27T14:57:10+5:302019-05-27T15:03:37+5:30
लांब केस मिळवण्यासाठी बाजार वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतात. पण या प्रॉडक्टमुळे तुम्हाला फायदा होईलच असं काही गरजेचं नाही.
लांब केस मिळवण्यासाठी बाजार वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतात. पण या प्रॉडक्टमुळे तुम्हाला फायदा होईलच असं काही गरजेचं नाही. जर तुम्हालाही लांब केस हवे असतील, त्यासाठी डोक्यातील ब्लड सर्कुलेशन वाढवावं लागेल. त्यासाठी तुम्ही खास उपाय करू शकता. याने ना तुमच्या केसात कोंडा होणार, ना सोरायसिस. तुमचे केस होतील लांब.
लांब केसांसाठी डोक्यातील ब्लड सर्कुलेशन
केस लांब तेव्हाच होऊ शकतात जेव्हा त्यांचं आरोग्य चांगलं राहील. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, डोक्याच्या त्वचेमध्ये चांगलं सर्कुलेशन गरजेचं आहे. याने केस वेगाने वाढण्यासही मदत मिळते. ब्लड सर्कुलेशन जर योग्य राहीलं तर केसांसाठी आवश्यक पोषक तत्त्वांचीही वाढ होते. तसेच वेगवेगळ्या समस्यांपासूनही सुटका मिळते.
लांब केसांसाठी योगाभ्यास
लांब केस हवे असतील तर तुम्हाला योगाभ्यासाचाही फायदा होऊ शकतो. वेगवेगळ्या आसनांसोबतच शिर्शासन स्थितीत अधिक वेळ राहू शकता. असे केल्याने डोक्यात ब्लड सर्कुलेशन वाढेल.
डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवा
टाइट, ड्राय डोक्याची त्वचा असेल तर केस लांब होण्यास अडथळा होऊ शकतो. याने केसांच्या मुळात मजबूत राहत नाही. त्यामुळे डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी टीट्री ऑइलचा वापर करू शकता.
कोल्ड शॉवर
लांब केसांसाठी तापमानही जबाबदार असतं. थंड तापमान ब्लड फ्लो वाढवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे कोल्ड शॉवरमुळे डोक्याच्या त्वचेतील ब्लड सर्कुलेशन वाढतं. पहिल्यांदा असं करणं तुम्हाला विचित्र वाटेल, पण याने डोक्याच्या त्वचेत ब्लड सर्कुलेशन वाढून केस लांब होण्यास मदत मिळेल.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. )