आता पार्लरपेक्षा कमी पैशांत घरच्या घरी हातांचं सौंदर्य वाढवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 12:49 PM2018-08-13T12:49:28+5:302018-08-13T12:51:32+5:30
आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच शरीराच्या इतर अवयवांचं सौंदर्यही तितकचं महत्त्वाचं आहे. अनेकदा पार्लर ट्रिटमेंटने चेहऱ्यासोबतचं आपल्या हातांचं आणि पायांचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय करण्यात येतात.
आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच शरीराच्या इतर अवयवांचं सौंदर्यही तितकचं महत्त्वाचं आहे. अनेकदा पार्लर ट्रिटमेंटने चेहऱ्यासोबतचं आपल्या हातांचं आणि पायांचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय करण्यात येतात. तसेच बाजार मिळणाऱ्या उत्पादनांचाही वापर करण्यात येतो. पार्लरमध्ये हातांचं सौंदर्य वाढवण्यासाठी खास मेनीक्योर ट्रिटमेंट असते. त्यातही अनेक प्रकार आढळून येतात. पण या खर्चिक प्रकारांपेक्षा घरच्या घरीही तुम्ही मेनीक्योर करून हातांचं सौंदर्य वाढवू शकता. आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या मेनिक्योरबाबत सांगणार आहोत, जे तुम्ही घरच्या घरी करू शकता.
मेनीक्योर करताना सर्वात आधी हातांना आणि नखांना स्क्रब केलं जातं. त्यानंतर फायलरच्या मदतीने नखांना शेप देण्यात येतो. मेनीक्योर केल्यानं हातांवरील मृत पेशी निघून जातात. त्याचबरोबर हात सुंदरही दिसतात. ठराविक दिवसांनी मेनीक्योर केल्यानं हातांच्या सौंदर्यासोबतच हातावरील धूळ आणि मृतपेशी निघून जातात.
रेग्युलर मेनीक्योर
तुम्ही घरी दररोज म्हटलं तरी हे मेनीक्योर करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वातआधी गरम पाणी घेऊन तुमचे हात त्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत. गरम पाण्यामुळे हातांवर असलेले क्यूटिकल्स निघून जातात. त्यानंतर नखांना ट्रिमिंग आणि फायलिंग केलं जातं. त्यानंतर नखांवर आणि हातांवर मॉयश्चरायझर लावावं.
स्पा मेनीक्योर
रेग्युलर मेनीक्योरनंतर हातांवर हायड्रेटिंग मास्क किंवा अॅरोमॅटिक सॉल्ट रबचा वापर करा. हे हातांसाठी फार आरामदायक असतं. स्पा मेनीक्योर केल्यामुळे हातांच्या नसांचा रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि हातांचं सौंदर्य वाढतं.
पॅराफिन मेनीक्योर
तुमचे हात रोजच्या कामामुळे अस्वच्छ होत असतील तर तुम्ही पॅराफिन मेनीक्योर करणं गरजेचं आहे. पॅराफिन मेनीक्योर करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये पॅराफिन वॅक्सने तुमच्या नखांवर मसाज करण्यात येतो. किंवा तुमच्या हातांना कोमट वॅक्समध्ये बुडवून ठेवण्यात येतं. त्यामुळे हात कोमल आणि मुलायम होतात.
लग्जरी मेनीक्योर
लग्जरी मेनीक्योरमध्ये कोमट वॅक्सने हातांचा मसाज करण्यात येतो. त्यासाठी जाळीदार हातमोज्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे हात मुलायम आणि हायड्रेट होतात.
हॉट स्टोन मेनीक्योर
या प्रकारच्या मेनीक्योरमध्ये खास पद्धतीचा स्टोन वापरण्यात येतो. ज्यामधून हीट इन्सुलेट होत असते. याने हातांवर मसाज करण्यात येतो. त्यामुळे हात स्वच्छ होतात.