ताकामुळे वाढते आतड्यांचे आरोग्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2016 07:11 PM2016-04-30T19:11:30+5:302016-05-01T00:41:30+5:30

ताक किंवा योगर्टसारख्या पदार्थांच्या सेवनाने जीवाणूंचे वैविध्य टिकून राहते, ज्याचा आरोग्याला खूप लाभ होतो.

Increased intestinal health due to the increased intake | ताकामुळे वाढते आतड्यांचे आरोग्य

ताकामुळे वाढते आतड्यांचे आरोग्य

Next
ण जे काही खातो त्या सर्वांचे आपल्या आतड्यावर परिणाम होत असतो. आतड्यातील जीवाणूंचा आरोग्याशी थेट संबंध असतो.

नेदरलँड येथील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर ग्रोनिंगनच्या (यूएमसीजी) संशोधकांनी आतड्यात असणाऱ्या जीवाणूंचा अभ्यसा केला असता असे दिसून आले की, ताक किंवा योगर्टसारख्या पदार्थांच्या सेवनाने जीवाणूंचे वैविध्य टिकून राहते, ज्याचा आरोग्याला खूप लाभ होतो.

1100 पेक्षा जास्त लोकांच्या विष्ठेचे नमुने गोळा करून वैज्ञानिकांनी आतड्यात असणाऱ्या जीवाणूंचे डीएनए विश्लेषण केले. त्याबरोबरच या लोकांचा आहार, औषधोपचार व आरोग्यासंबंधी माहितीदेखील गोळा केली. या अध्ययनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच निरोगी व्यक्तींवर अशा प्रकारचे एवढ्या मोठ्या स्वरूपात संशोधन करण्यात आले.

सिस्का विमेंगा यांनी सांगितले की, डिएनए विश्लेषणातून स्पष्ट झाले की, कोणते घटक आतड्यांतील जीवाणूंची विविधता वाढण्यास उपयुक्त असतात. जे लोक नियमितपणे योगर्ट किंवा ताकाचे सेवन करतात त्यांच्या आतड्यात जीवणूंची विविधता मोठ्या प्रमाणात आढळून आली. कॉफी आणि वाईनदेखील विविधता वाढविण्यास उपयोगी असतात; परंतु केवळ दुध किंवा अति कॅलरीयुक्त आहारामुळे वैविध्य घटते.

जितक्या विपूल प्रमाणात विविध प्रकारचे जीवणू आतड्यात असतील तेवढे आरोग्यासाठी लाभदायक असते.  साठ प्रकारे अन्नपदार्थ यासाठी लाभदायक असतात तसेच 19 प्रकारची औषधेसुद्धा उपलब्ध आहेत.

Web Title: Increased intestinal health due to the increased intake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.