अपूरी झोप हा एक प्रकारचा रोग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2016 11:14 AM2016-10-09T11:14:12+5:302016-10-17T15:30:48+5:30
अपुरी झोप हा एक प्रकारचा रोग असून जागतिक आरोग्य संघटनेने त्याची काही लक्षणे सांगितली आहेत. झोपताना जोरात घोरणे, श्वास अडकणे ही याची लक्षणे आहेत. यामध्ये श्वास अडकल्यामुळे आॅक्सिजनचा प्रवाह काही सेकंदांसाठी थांबतो आणि कार्बन डायआॅक्साइड बाहेर जाण्याचेही काही सेकंदांसाठी बंद होते. या वेळी मेंदू जागा होतो. काही सेकंदांसाठी नाकातील हवेची बंद झालेली वाट सुरळीत होते आणि पुन्हा श्वासोच्छ्वास चालू होतो
Next
पुरी झोप हा एक प्रकारचा रोग असून जागतिक आरोग्य संघटनेने त्याची काही लक्षणे सांगितली आहेत. झोपताना जोरात घोरणे, श्वास अडकणे ही याची लक्षणे आहेत. यामध्ये श्वास अडकल्यामुळे आॅक्सिजनचा प्रवाह काही सेकंदांसाठी थांबतो आणि कार्बन डायआॅक्साइड बाहेर जाण्याचेही काही सेकंदांसाठी बंद होते. या वेळी मेंदू जागा होतो. काही सेकंदांसाठी नाकातील हवेची बंद झालेली वाट सुरळीत होते आणि पुन्हा श्वासोच्छ्वास चालू होतो. यामुळे रात्रीची झोप अपुरी होते आणि दिवसा झोप येत राहते. यामुळे कामात लक्ष केंद्रित करताना अडथळा निर्माण होतो, डोके दुखते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. अपुºया झोपेबाबत तंज्ञाकडून सल्ला घेणाºयांचे प्रमाणही कमी असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तसेच अपॅुºया झोपेमुळे नैराश्य, मानसिक तणाव, हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात आदी विकारांना सामोरे जाण्याची शक्यता असते, असे संशोधन नुकतेच तज्ञांनी मांडले आहे. त्यासाठी नियमित आणि पुरेशी झोप आवश्यक असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. डॉक्टर तसेच रुग्णांमध्ये याबाबत असलेला जनजागृतीचा अभाव हे यामागील मुख्य कारण आहे. दिवसेंदिवस अपुरी झोप असणाºया रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.