International Yoga Day 2019 : केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय आहे 'हे' योगासन!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 04:52 PM2019-06-18T16:52:08+5:302019-06-18T16:56:53+5:30
आंतराष्ट्रीय योग दिवस 2019 यावर्षी 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. परंतु, योगा करण्याचे अनेक आरोग्यदायीच नाही तर सौंदर्यवर्धकही फायदे आहेत.
आंतराष्ट्रीय योग दिवस 2019 यावर्षी 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. परंतु, योगा करण्याचे अनेक आरोग्यदायीच नाही तर सौंदर्यवर्धकही फायदे आहेत. आपल्यापैकी अनेकजणांना हे फायदे माहितच नाहीत. आपल्यापैकी बरेचजण पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. अशातच केस काळे करण्यासाठी आपण नैसर्गिक पद्धत शोधत असतो. पण त्यामुळे कायमस्वरूपी केस काळे ठेवू शकत नाही. परंतु योगामध्ये काही अशी आसनं आहेत. जी केसांचा काळआ रंग टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. परंतु, योगामध्ये काही अशी आसनं आणि प्राणायाम आहेत. जे केसांचा काळ रंग टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. जर तुम्हीही योगासनं करत असाल तर या प्राणायामबाबत नक्की जाणून घ्या.
ठराविक वयानंतर प्रत्येकाचेच केस पांढरे होतात. हा तर निसर्गाचा नियम आहे. परंतु जर कोणाचे केस कमी वयातच पांढरे होत असतील तर त्यामागे अनेक कारणं असतात.
जर वेळेआधीच केस पांढरे होत असतील तर त्यामागे काहीतरी विशेष कारण असण्याची शक्यता आहे. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करण्यासबतच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा समावेश करणं गरजेचं असतं.
जर तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगाभ्यासाचा समावेश केला तर तुम्ही तुमच्या पांढऱ्या केसांची समस्या दूर करू शकता. त्यासाठी तुम्हाला दररोज फक्त 15 मिनिटं कपाळभाति प्राणायाम करावा लागेल. हा योगाभ्यासातील सर्वात चर्चित प्राणायाम आहे.
केस काळे ठेवण्यासाठी करा कपाळभाती प्राणायाम...
खरं तर या प्राणायामच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडला आहे. कपाळ म्हणजे आपलं कपाळ आणि भाती म्हणजे, चमक. योगामध्ये प्राणायाम श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या विधिला म्हटलं जातं.
कपाळभाती प्राणायाम करण्याची विधि...
कपाळभाती प्राणायाम करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला उपयुक्त आसनाची निवड करणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला असं आसन निवडायचं आहे, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही अगदी सहज 15 मिनिटांपर्यंत बसू शकता. आसनांमध्ये सिद्धासन, पद्मासन किंवा वज्रासन यांपैकी
एकाची निवड करू शकता.
कपाळभाती प्राणायाम करताना श्वास बाहेर सोडण्याची क्रिया करणं गरजेचं आहे. श्वास सोडताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. हे आसन करताना पोटाला आतल्या बाजूस धक्का देणं गरजेचं आहे.
कपाळभाती प्राणायाम केल्याने होणारे 7 फायदे :
- किडनी आणि लिव्हरचं काम सुरळीत चालण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त हे ब्लड सर्क्युलेशन आणि पचनक्रिया सुधारण्यासाठीही मदत करतं.
- डोळ्यांवरील तणाव दूर करणं आणि डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी.
- कपाळभाती फफ्फुसांचं आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं आणि त्याची क्षमताही वाढवतं.
- कपाळभाती नियमित केल्याने चेहऱ्यावर चमक येते.
- स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यासाठी मदत होते. डिप्रेशनपासून दूर ठेवतं आणि सकारात्मक बनवतं.
- अॅसिडिटी आणि गॅस संबंधित समस्या दूर करतं.
- कपाळभाती प्राणायाम मेटाबॉलिज्म सुरळीत करतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.