... हे तर ‘हार्टअटॅक’ला निमंत्रण!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2016 02:39 PM2016-04-28T14:39:15+5:302016-04-28T20:09:15+5:30
एकाच ठिकाणी अधिक बसल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
Next
ए ाच जागी खूप वेळ बसणे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. एका नव्या रिसर्चनुसार, एकाच ठिकाणी अधिक बसल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
त्यामुळे आॅफिसमध्ये थोड्या थोड्या अंतराने उठून थोडे फिरून येण्याचा सल्ला संशोधक देत आहेत. एका जागी बसल्याने हृदयाला रक्तपुरवठा करणाºया वाहिनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढून हार्टअटॅक येण्याची शक्यता जास्त असते.
युनिव्हर्सिटी आॅफ टेक्सास साऊथवेस्टर्न मेडिकल सेंटर येथील प्रमुख संशोधक अमित खेरा यांनी माहिती दिली की, एकाच जागी बसण्यामुळे हृदयात अॅथेरॉस्क्लेरोसिस तयार होते हे सिद्ध करणारे आमचे पहिलेच संशोधन आहे.
एकाच जागी बसण्याच्या कालावधीमध्ये दर एका तासाच्या वाढीबरोबर रक्तवाहिनीत कॅल्शियम साचण्याचे प्रमाण 12 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असते. याचाच अर्थ की, रोज आपला एकाच जागी बसण्याचा कालावधी एक-दोन तास कमी करू शकलो तर हृदयाच्या आरोग्यासाठी ते फार लाभदायक ठरू शकते.
या संशोधनामध्ये सुमारे दोन हजार लोकांच्या शारीरिक हालचालींवर एका मशाीनद्वारे सात दिवस नजर ठेवण्यात आली. त्यातून असे दिसून आले की लोक दिवसातून सरासरी 5.1 तास एकाच जागी बसून असतात. एवढा वेळ कोणतीही शारीरिक हालचाल न करता बसणे म्हणजे हार्टअटॅकला निमंत्रण देण्यासारखेच आहे.