मासिक पाळीदरम्यान वॅक्सिंग करावं की नाही? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 05:07 PM2018-10-23T17:07:13+5:302018-10-23T17:10:55+5:30
आपल्या शरीरावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिला वॅक्सिंगचा मार्ग अवलंबतात. परंतु काही महिला असा विचार करतात की, मासिक पाळीदरम्यान वॅक्सिंग करणं टाळलं पाहिजे.
आपल्या शरीरावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिला वॅक्सिंगचा मार्ग अवलंबतात. परंतु काही महिला असा विचार करतात की, मासिक पाळीदरम्यान वॅक्सिंग करणं टाळलं पाहिजे. अनेक महिलांच्या मनात याबाबत अनेक शंका कुशंका असतात. परंतु यामध्ये खरं ते काय? खरंच मासिक पाळीदरम्यान वॅक्सिंग करणं शरीरासाठी हानिकारक ठरतं का? अनेक जणींच्या मनात याबाबत अनेक प्रश्न असतात. अनेक महिलांच्या तर अशा तक्रारी आहेत की, मासिक पाळीदरम्यान त्यांनी वॅक्सिंग केल्यामुळे त्यांना स्किन इन्फेक्शन किंवा अॅलर्जी यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. अनेकजणींना वॅक्सिंग केल्यानंतर स्किनवर जळजळ होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागलं.
का होते जळजळ?
वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेला होणाऱ्या जळजळीपासून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर चुकूनही वॅक्सिंग करू नका. मासिक पाळीच्या साधारणतः सुरुवातीच्या तीन दिवसांमध्ये स्किन फार सेंसिटिव्ह होते. ज्यामुळे फक्त वॅक्सिंग करतानाच नाही तर, वॅक्सिंग केल्यानंतरही स्किनवर जळजळ होते. त्यामुळे शक्यतो मासिक पाळीदरम्यान वॅक्सिंग करणं टाळावं.
वॅक्सिंगनंतर होणाऱ्या जळजळीपासून असं बचाव करा :
- वॅक्सिंगनंतर हाताला कोल्ड क्रिम लावा. असं केल्याने स्किनची जळजळ थांबण्यास मदत होईल.
- वॅक्सिंगनंतर टी ट्री ऑइल स्किनवर लावा. या तेलामध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टीसेप्टिक गुणधर्म असतात. जे स्किनसाठी फायदेशीर ठरतात.
- जर वॅक्सिंगनंतर स्किनला खाज येत असेल तर अर्धा कप खोबऱ्याच्या तेलामध्ये 1 कप साखर मिक्स करा आणि या मिश्रणाने स्क्रब करा. खोबऱ्याच्या तेलामध्ये अॅन्टीफंगल आणि अॅन्टीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेला होणारी खाज दूर होते.