​असे रहा तणावमुक्त !!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2016 11:02 AM2016-09-09T11:02:33+5:302016-09-10T12:43:03+5:30

दिवसभर कामाची तगतग, धावपळ, कामाचा व्याप आणि त्यामुळे येणारा ताणतणाव हा आपल्या आयुष्यातील नित्याचा विषय आहे.

It is stress free !!! | ​असे रहा तणावमुक्त !!!

​असे रहा तणावमुक्त !!!

Next
n style="color:#800080;">-रवींद्र मोरे 

दिवसभर कामाची तगतग, धावपळ, कामाचा व्याप आणि त्यामुळे येणारा ताणतणाव हा आपल्या आयुष्यातील नित्याचा विषय आहे. या अतिरिक्त  तणावामुळे बरेच शारीरिक व मानसिक आजार उद्भवतात हे एका संशोधनातून स्पष्ट झालेले आहे. या तणावापासून मुक्तता मिळण्यासाठी अनेक ठिकाणी उपाययोजना केली जाते, त्यात ध्यानधारणा, योगासने आदींचे शिबिरेदेखील घेतले जातात. मात्र प्र्रत्येकाला अशा ठिकाणी जाणे शक्य नसल्याचे आढळून आले आहे. मग घरगुती उपाययोजना करुन आपण तणावमुक्त कसे राहु शकू  याबाबत आजच्या फीचरमध्ये जाणून घेऊया...

तणावमुक्त राहण्यासाठी काही साध्या टिप्स आहेत, ज्या आपण घरी आल्यानंतर लगेच करु शकतात. घरात आल्यानंतर मुले, घराचे काम, रात्रीचे जेवण यासारख्या गोष्टी तर सदैव तत्पर असतील, मात्र आपले आरोग्य जर एकदाचे गमविले तर ते नवीन मिळविणे खूप कठीण होईल. 
तणावमुक्त होण्यासाठी आयुष्यात लहान-लहान गोष्टी बदलायला शिका. मग काय आहेत या लहान पण अति महत्त्वाच्या गोष्टी....

अनवाणी पायाने फिरा
आॅफिस किंवा कामावरून घरी आल्याने आपले बुट काढून काही तास विना चप्पल रहा. यामुळे रक्ताभिसरण होऊन नसांना शक्ती मिळेल ज्यामुळे तणाव कमी होईल. जर आपल्या घराच्या भोवती गवत किंवा माती असलेली जागा असेल तर त्यावर देखील अनवाणी चाला. 

आॅफिसच्या कामांना विसरा
घरी पोहच्यानंतर लगेच आपला मोबाइल किंवा लॅपटॉपला बाजूला ठेवा कारण आपली जबाबदारी संपली आहे. घर आणि आॅफिस दोन्ही वेगवेगळे करायला शिका. जेव्हा आपण घरी असाल, तर आपला पूर्ण वेळ आपले व्यक्तिगत आयुष्य आणि आपल्या परिवारासाठी व्यतीत करा.

थोडा वेळ बगीच्यात जा
घरी आल्यानंतर स्वत:साठी फक्त अर्धा तास वेळ काढा. या वेळात घराच्या जवळील किंवा कॉलनीत असलेल्या बगीच्यात पायी फिरायला जा. यामुळे तणाव कमी तर होईलच त्याचबरोबर शरीरात चांगले हार्माेन्स देखील तयार होतील.  

थोडावेळ झोपा 
आपल्याला तासनतास झोपायची गरज नाही. फक्त १५-२० मिनटे झपकी मारा, यामुळे शरीरात पुन्हा नव्याने उर्जा निर्माण होईल. सोफा असेल तर त्यावर झोपून पायांना वर करा आणि डोळे बंद करुन काही मिनीटे लांब श्वास घ्या.   
   
गरम पाण्याने आंघोळ करा
घरी आल्यानंतर जर आपण गरम पाण्याने आंघोळ कराल तर आपल्या शरीराला आराम मिळेल आणि मेंदुदेखील शांत होईल. यामुळे आपल्या शरीराचे दुखणे बंद होईल आणि आपण फे्रश व्हाल. 

दोन काम एकाचवेळी नको
घरी आल्यानंतर काही घरगुती कामे असतील तर एकाचवेळी दोन किंवा त्यापेक्षा कामे लगेच करु नका. त्या सर्व कामांचे बॅलन्स करा. मात्र कामांचे बॅलन्स करताना मनाची शांती महत्त्वाची आहे. यामुळे आपल्याबरोबर इतरांचाही तणाव कमी होईल. 

१० मिनीटे स्वत:च्या बाबतीत विचार करा
शांत होऊन स्वत:च्या बाबतीत फक्त १० मिनीटे विचार करा. त्यातच वर्तमानाचा अधिक विचार करा. तसेच आपल्याला भविष्यात काय अपेक्षित आहे, याबाबत मनन करा. आपल्या आयुष्यात काय काय चांगले घडले आहे किंवा आपल्याला कोणत्या गोष्टींपासून आनंद मिळतो, याविषयी विचार करा. आपले आरोग्य अतिशय महत्त्वाचे असून आरोग्याला विचारांमध्ये प्राधान्यक्रम द्या. 

आवडती गाणी गुणगुणा
आपल्याला आवडत असलेले गाणे आठवून ती गुणगुणली तर दिवसभराचा थकवा आणि त्यामुळे आलेला तणावापासून नक्कीच मुक्तता मिळेल. त्यामुळे घरी आल्यानंतर आपल्या आवडीचे गाणे नक्की ऐका. 

हलका व्यायाम करा 
हलका व्यायाम केल्याचे कित्येक फायदे आहेत. यामुळे शारीरिक आणि मानसिक स्तर खूपच प्रभावशाली होतो. हलक्या व्यायामुळे शरीरास बळकटी तर येतेच शिवाय तणावमुक्त होण्यासाठीची कुशलता प्राप्त होते. एक सुदृढ मनुष्य थकवा आणि तणावाचा सामना चांगल्या पद्धतीने करु शकतो. 

संतुलित आहार घ्या 
संतुलित आहार हा व्यायाम करणे इतकाच महत्त्वाचा आहे. सम्यक, संतुलित आणि सात्विक आहार शरीर आणि मनाला सुदृढ ठेवतो. तळलेले चटचपटीत खाण्याने पचनशक्ती प्रभावित होऊन शरीराला अपाय होतो. त्यामुळे तणावात अधिक भर पडते. 

Web Title: It is stress free !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.