​दररोज केवळ एक तास व्यायाम काफी है...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2016 01:20 PM2016-07-30T13:20:01+5:302016-07-30T18:50:01+5:30

फक्त एक तास व्यायाम केला असता आठ किंवा त्यापेक्षा जास्त काळ बैठेकाम करण्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका टळतो.

Just one hour of exercise is enough every day ... | ​दररोज केवळ एक तास व्यायाम काफी है...

​दररोज केवळ एक तास व्यायाम काफी है...

Next
यायाम किती महत्त्वाचा आहे हे काही वेगळे सांगणे नको. व्यायामाचे फायदे मुखपाठ असूनही प्रत्येक जण करेलच असे नाही. पण तुम्हाला माहित आहे का की, दररोज केवळ एक तास व्यायाम केल्यामुळे बैठेकाम करणाऱ्यांना जीवनदान मिळू शकते? अहो हे खरं आहे. 

फक्त एक तास जॉगिंग किंवा सायकलिंगसारखा व्यायाम केला असता आठ किंवा त्यापेक्षा जास्त काळ बैठेकाम करण्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका टळतो. शारीरिक आळस आणि हृदयविकार, मधुमेह आणि काही विशिष्ट कॅन्सरचा संबंध असतो. त्यामुळे दरवर्षी पन्नास लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. परंतु आता आपल्या कामामुळे अधिक काळ बसणे अनिवार्य असेल तर किमान एक तास शारीरिक हालचाल होईल अशी कामे केलीच पाहिजे.

कें म्ब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञ उल्फ इकेल्युंड सांगतात की, रोज एक तास व्यायाम करणे अत्यंत आवश्यक जरी असले तरी व्यस्त दिनक्रमातून एवढा वेळ काढणे अनेकांना शक्य नसते. पण थोड्याफार प्रमाणात तरी शारीरिक अंगमेहनत केलीच पाहिजे.

त्यांनी केलेल्या अध्ययनातून असे दिसून आले की, जे लोक आठ तास बसून काम आणि व्याायामदेखील करतात, त्यांच्यामध्ये वर उल्लेख केलेल्या कारणांमुळे मृत्यू होण्याची शक्यता आठ तास काम व व्यायामही न करणाऱ्या लोकांपेक्षा खूप कमी असते.

Web Title: Just one hour of exercise is enough every day ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.