लिक्विड लिपस्टिक वापरताना काय काळजी घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 03:31 PM2019-01-15T15:31:13+5:302019-01-15T15:33:41+5:30
सध्या मुलींमध्ये लिक्विड लिपस्टिक फार लोकप्रिय असून सर्वात जास्त यूज होणाऱ्या मेकअप प्रोडक्ट्समध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांना मेकअप करण्याची हौस असेल त्यांच्या बॅगमध्ये तुम्हाला किमान एक तरी लिक्विड लिपस्टिक नक्की मिळेल.
सध्या मुलींमध्ये लिक्विड लिपस्टिक फार लोकप्रिय असून सर्वात जास्त यूज होणाऱ्या मेकअप प्रोडक्ट्समध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांना मेकअप करण्याची हौस असेल त्यांच्या बॅगमध्ये तुम्हाला किमान एक तरी लिक्विड लिपस्टिक नक्की मिळेल. इतर कोणत्याही लिपस्टिकपेक्षा ही जास्त वेळ टिकते. तसेच या लिपस्टिकचा कलरही इन्टेस असतो. या लिपस्टिकचा फक्त एक कोट तुमच्या ओठांना सुंदर लूक देण्यासाठी उपयोगी पडतो. जर तुम्हीही लिक्विड लिपस्टिकचे शौकीन असाल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही व्यवस्थित लिपस्टिक अप्लाय करू शकता.
यासाठी लागतो वेळ
इतर लिपस्टिक्सप्रमाणे ही लिपस्टिक पटकन लावता येत नाही. लिक्विड लिपस्टिक लावताना थोडासा धीर धरणं आवश्यक असतं. लिपस्टिक अप्लाय करताना फार घाई करू नका. प्रॉपर आउटलाइन आणि फिनिशिंग देऊन लिपस्टिक अप्लाय करा.
मेकअप करणं विसरू नका
लिक्विड लिपस्टिक फार पिगमेंटेड असते. त्यामुळे ही लिपस्टिक लावण्यासोबतच मेकअप करणंही आवश्यक असतं. मेकअपच्या बेससाठी फाउंडेशन लावा आणि व्यवस्थित मेकअप करा. तुम्ही लिपस्टिकला मॅचिंग असं ब्लशरही यूज करू शकता.
जास्त लिपस्टिक लावू नका
लिक्विड लिपस्टिकचा फक्त एक कोटच पूरे असतो. एक्सट्रा पिगमेंटेशनपासून वाचण्यासाठी लिपस्टिक लावण्याआधी एक्स्ट्रा लिपस्टिक स्टिकवरून काढून टाका. यामुळे तुमच्या लिप्सला टेक्चरही मिळेल आणि एक्स्ट्रा लिपस्टिकवर कंट्रोलही राहिल. ड्रामॅटिक लूकसाठी तुम्ही लिपस्टिकचा एक्सट्रा कोट्स लावू शकता.
ओठांना मॉयश्चराइज करा
जर तुमचे ओठ नेहमी कोरडे पडत असतील तर लिपस्टिक लावण्याआधी ओठ मॉयश्चराइज करा. त्यामुळे तुमचे ओठ हायड्रेट होतील. लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर लिप बाम लावून काही वेळासाठी तसचं ठेवा. त्यानंतरच लिक्विड लिपस्टिक अप्लाय करा.
खालच्या ओठांवर सर्वात आधी लावा लिपस्टिक
लिपस्टिक लावताना लक्षात घेण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लिपस्टिक सर्वात आधी खालच्या ओठांवर लावा आणि दोन्ही ओठ एकत्र प्रेस करा. ज्यामुळे लिपस्टिक एकत्र मिक्स होऊन जाईल. लिप ब्रश किंवा लिप लायनरमुळे ओठांना व्यवस्थित शेप द्या. लक्षात ठेवा की, लिप लायनरचा कलर लिपस्टिकपेक्षा एक शेड डार्क असणं गरजेच आहे.